मुंबई

पदपथावर शासकीय अतिक्रमण

CD

तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : नवी मुंबई हे शहर ‘नियोजित शहर’ म्हणून ओळखले जाते; मात्र बेलापूर सेक्टर ११ मधील सध्याची परिस्थिती पाहता या ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘नाव सोनुबाई आणि हाती कथळाचा वाळा’ या म्हणीप्रमाणे, नियोजनाचे धडे देणाऱ्या आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या शासकीय व नामांकित संस्थांनीच सार्वजनिक पदपथांवर अतिक्रमण केल्याचे वास्तव समोर आले आहे.

सेक्टर ११ मधील नाल्यालगत असलेल्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पादचाऱ्यांसाठी पदपथांची स्पष्ट तरतूद करण्यात आली; मात्र यापैकी एका बाजूचा पदपथ पूर्णपणे वापरात राहिलेला नाही. या ठिकाणी चालण्यासाठी जागाच नसून, त्या जागेवर शोभेची झाडे, गवती लॉन आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे. परिणामी, पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावरून चालावे लागते.

या मार्गावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (आयआयए), इन्स्टिट्यूट ऑफ टाऊन प्लॅनर्स, इंडिया (आयटीपीआय), राष्ट्रीय सुरक्षा परिषद यांसारख्या नामांकित व तांत्रिक संस्थांची कार्यालये आहेत. विशेष म्हणजे, शहर नियोजन आणि आर्किटेक्चरचा आदर्श घालून देणाऱ्या याच संस्थांनी आपल्या इमारतीसमोरील सार्वजनिक पदपथांवर लोखंडी रेलिंग बसवून तो भाग पूर्णपणे बंदिस्त केला आहे. सार्वजनिक पादचारी मार्गाला खासगी ‘बागे’चे स्वरूप देण्यात आल्याने हा प्रकार नागरिकांमध्ये संताप निर्माण करणारा ठरत आहे.
अवघ्या तीन महिन्यांपूर्वी या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले. नियमानुसार, अशा कामाच्या वेळी महापालिकेचे वरिष्ठ अभियंते व अधिकारी स्थळ पाहणी करतात, मग या पाहणीदरम्यान पदपथावरील अतिक्रमणे, अनधिकृत रेलिंग आणि बंद केलेले पादचारी मार्ग अधिकाऱ्यांच्या नजरेस कसे पडले नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांचे हाल
या अडवलेल्या पदपथामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सुरक्षितपणे चालण्यासाठी जागाच नसल्याने अपघाताची भीती कायम आहे. ‘नियोजित नवी मुंबई’त सामान्य नागरिकांनी नेमके चालायचे कुठे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

पदपथ हे पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी असतात. शासकीय किंवा नामांकित संस्थांच्या शोभेसाठी नव्हे. बेलापूरमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली पादचाऱ्यांच्या हक्काचा बळी दिला जात आहे. संबंधित संस्थांनी तत्काळ स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा महापालिकेने बुलडोझर चालवून कारवाई करावी. तसेच या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे.
- अनिल पवार, सदस्य, सजग नागरिक मंच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

Latest Marathi News Live Update : केंद्र सरकारचे लक्ष पुरवठा साखळीवर

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

SCROLL FOR NEXT