जव्हारकरांच्या घशाला कोरड
नादुरुस्त जलवाहिनीमुळे पुरवठा विस्कळीत
जव्हार, ता.२१ (बातमीदार)ः जव्हार शहरातील मुख्य जल वाहिनी नादुरुस्त असल्याने अनेक भागांमध्ये अपुरा तसेच कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जव्हार शहराची पाणीपुरवठा व्यवस्था १०० वर्षे जुन्या जलवाहिनीवर अवलंबून आहे. नियमित देखभाल, दुरुस्ती अभावी वारंवार गळती, दाब कमी, व्हॉल्व निकामी होण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी, पाण्याची वितरण व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. पाणी वितरणासाठी नेमलेले कर्मचारी प्रशिक्षित नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तसेच तांत्रिक नियोजनातील त्रुटींमुळे समस्या गंभीर बनल्या आहेत. विशेष म्हणजे, दर्जेदार काम होत नसल्याने फक्त कागदोपत्री देयके काढली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहेत.
-----------------------------------
‘खडखड’ योजना कागदावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये शहराची गरज लक्षात घेत ‘खडखड’ योजनेसाठी १७ कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, नऊ वर्षे पूर्ण होऊन शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये जलवाहिनीसाठीचे खोदकामाची कामे प्रलंबित आहे.
----------------------------
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा व्हॉल्व नादुरुस्त असल्याचे पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध झाली असून संबंधित विभागाला तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- इमरान मेमन, सभापती, पाणीपुरवठा
-------------------------------------
खडखड नळ पाणीपुरवठा योजना ९ वर्षांपासून का प्रलंबित आहे. वारेमाप खर्च होऊनही योजना पूर्ण होत नसेल तर नागरिकांच्या भावनांशी खेळ सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मूलभूत हक्कांपासूनच वंचित रहावे लागत आहे.
- राजेश धात्रक, नागरिक, जव्हार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.