सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती
शिक्षण महर्षी मिलिंद पाटील यांचे प्रतिपादन
वाणगाव, ता. २१ (बातमीदार) : निरोगी शरीर आणि मन आपल्याला ध्येय गाठण्यासाठी ऊर्जा, एकाग्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन देते. योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तणाव व्यवस्थापन सुदृढ आरोग्याचे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिक्षण महर्षी मिलिंद पाटील यांनी केले. जे.एस.डब्ल्यू. स्टील कोटेड प्रोडक्स लिमिटेड प्रायव्हेट कंपनी, तारापूर, वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठान, आसनगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुकुल शिक्षण संकुलातील तीनदिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे ते बोलत होते.
व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात यश मिळवता येते. आरोग्य चांगले असल्यास आपण आयुष्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो, कामात अधिक उत्पादनक्षम राहू शकतो आणि जीवनातील आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असेल तरच आपण जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी आणि समाधानी होऊ शकतो, म्हणूनच आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे, ग्रामीण भागातून हजारो संख्येने येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण संकुलात मोफत शिक्षण वसतिगृह व आधुनिक सुविधा देण्यात येतातच, त्याचबरोबर उत्तम आरोग्य राहावे, या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या वेळी जे.एस.डब्ल्यूचे प्लांट हेड प्रवीण माबीयान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील, नवी मुंबई येथील संजीवनी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. केतकी तरे, डॉ. अपर्णा पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष विकास पाटील, कार्यकारी संचालिका तृप्ती पाटील, जे.एस.डब्ल्यू.चे धुमाळ, संतोष महाजन, प्राचार्य, प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------
१,६०० विद्यार्थ्यांचा सहभाग
- गुरुकुल शिक्षण संकुलातील फार्मसी, डिझाइन, हॉटेल मॅनेजमेंट, लॉ आणि कृषीच्या तब्बल १,६०० विद्यार्थ्यांसह संस्थेच्या आणि संलग्न विभागाच्या एकूण १४२ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनीही मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. संस्था गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, वसतिगृह आणि अन्नदान देण्याचे कार्य करीत आहे.
- विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही वेळोवेळी काळजी घेण्यात येते. मोफत आरोग्य शिबिरांमुळे समाजातील गरीब, गरजू घटकांना वेळेवर आरोग्यसेवा मिळण्यास मदत होते आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढते, असे मत जे.एस.डब्ल्यू. स्टील कोटेड प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनीचे मुख्य व्यवस्थापक प्रवीण माबीयान यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.