मुंबई

जेन झी विद्यार्थ्यांच्या घडणीत अध्यापकांची भूमिका

CD

जेन झीच्या मानसिकतेप्रमाणे अध्यापन बदलणे गरजेचे
चिंचणीच्या महाविद्यालयात अध्यापक विकास कार्यक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन

वाणगाव, ता. २१ (बातमीदार) : जेन झीच्या मानसिकतेप्रमाणे अध्यापन बदलणे गरजेचे असून, अशा ज्वलंत विषयांवर बोलले गेले पाहिजे, तरच त्यातून समाज घडू शकतो, असे मत सी. टी. इ. एस.चे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ यांनी व्यक्त केले आहे. तारापूर एज्युकेशन सोसायटीचे श्री. पी. एल. श्रॉफ महाविद्यालय, चिंचणी येथील ‘जेन झी विद्यार्थ्यांच्या घडणीत अध्यापकांची भूमिका’ या विषयावर दोनदिवसीय आंतरमहाविद्यालयीन अध्यापक विकास कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांचे अध्यक्षपद श्रॉफ यांनी भूषवले. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयव्हीपीचे उपव्यवस्थापक संजय चौधरी हेदेखील उपस्थित होते.
या विकास कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मानसोपचार, तसेच बाल व युवक तज्ज्ञ डॉ. किन्नरी दोशी यांनी जेन झी विद्यार्थ्यांच्या मानसिक व भावनिक पैलूंवर सविस्तर प्रकाश टाकला. दुसऱ्या सत्रात ब्रेन राईसचे संस्थापक व मार्गदर्शक आणि वर्ल्ड मेमरी स्पोर्टस कौन्सिलचे उपाध्यक्ष सुनील सावंत यांनी विविध संवादात्मक उपक्रमांद्वारे जीवनकौशल्ये व मूल्यशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी एडटेक, एनईपी आणि एआय सल्लागार मंदार भानुशे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत, नावीन्यपूर्ण अध्यापन तंत्रांबाबत मार्गदर्शन करून जेन झी विद्यार्थ्यांसाठी अध्यापन-अध्ययन प्रक्रिया अधिक प्रभावी कशी करता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच मेटा रिझ टेक्नॉलॉजीजचे संस्थापक अली सोलंकी यांनी तंत्रज्ञान व सामाजिक माध्यमांची भूमिका अधोरेखित करत शिक्षकांनी डिजिटल मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, असे स्पष्ट केले. महाविद्यालयाच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सहभागींनी जेन झी विद्यार्थ्यांविषयीची समज वाढणे, शिक्षक-विद्यार्थी संवाद अधिक प्रभावी होणे, तसेच नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती स्वीकारण्यास मदत झाल्याचा सकारात्मक अभिप्राय दिला आहे.
-----------------
चौकट
- अध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग

महाविद्यालयाचा गुणात्मक दर्जा सातत्याने उंचावण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून प्र. प्राचार्य डॉ. सुचिता करवीर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा अध्यापक विकास कार्यक्रम त्यांच्या, संस्थेच्या सदस्या डॉ. रमिलाबेन श्रॉफ आणि आयक्यूसी समन्वयक डॉ. चित्रा आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या संयोजक म्हणून प्रा. गौरी क. दातीर व सहसंयोजक म्हणून प्रा. परवीन कलाडिया यांनी मोलाची भूमिका बजावली. या कार्यक्रमास विविध महाविद्यालयांतील ७० अध्यापकांनी सहभाग नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT