मुंबई

पावणे तीन हजार मूर्ति होणार विराजमान

CD

ठाणे जिल्ह्यात माघी गणेशोत्सवाचा उत्साह
सार्वजनिकपेक्षा घरगुती गणेशमूर्तींची संख्या अधिक
ठाणे, ता. २१ : लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणेच आता ठाण्यात माघी गणेशोत्सवाची क्रेझही दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात सुमारे २,६९७ गणपती विराजमान होणार आहेत. विशेष म्हणजे, यंदा भव्य सार्वजनिक मंडळांपेक्षा घरगुती बाप्पांच्या प्रतिष्ठापनेकडे नागरिकांचा कल अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

ठाणे जिल्ह्यात माघी गणेशोत्सवाचे मुख्य केंद्र म्हणून कल्याण परिमंडळ समोर आले आहे. एकीकडे भव्य देखावे आणि गर्दी टाळण्याकडे कल असताना, दुसरीकडे पारंपरिक पद्धतीने घरीच उत्सव साजरा करण्याला पसंती मिळत आहे. यंदाही दीड आणि पाच दिवसांच्या गणपतींना भाविकांनी मोठी पसंती दिली आहे. मर्यादित कालावधीत श्रद्धेने पूजा करून बाप्पाला निरोप देण्याची परंपरा वाढताना दिसत आहे. भव्यतेपेक्षा भक्तीकडे झुकलेली ही मानसिकता ठाणे जिल्ह्यातील उत्सवाचे स्वरूप अधिक शांत आणि कौटुंबिक करत आहे. गुरुवारपासून (ता. २२) बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होत असून ठाणे जिल्हा गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमणार आहे.

परिमंडळनिहाय बाप्पांची आकडेवारी
परिमंडळ सार्वजनिक गणपती घरगुती गणपती एकूण
कल्याण ७० ९८० १,०५०
भिवंडी ०६ ७७६ ७८२
ठाणे २२ ३५६ ३७८
उल्हासनगर ३२ २५९ २९१
वागळे इस्टेट ३१ १६५ १९६
एकूण १६१ २,५३६ २,६९७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai demolition incident: बापरे! मुंबईत मोठी दुर्घटना टळली, नाहीतर... स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, काय घडलं?

Pension Scheme: NPS पेंशन योजनेतून पैसे काढताना या चुका करू नका; जाणून घ्या पैसे काढण्याचे सर्व नियम

Latest Marathi News Live Update : योग्य मोबदल्यासाठी मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांचे लोटांगण आंदोलन; इंदोर महामार्गावर वाहतूक ठप्प

Maharashtra State Government Loan : महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा डोंगर ११ लाख २ हजार ६५४ कोटींच्याही पुढे जाणार?

Karnataka Budget Protest : अर्थसंकल्पाविरोधात भाजपचे ‘खाली चंबू’ आंदोलन; सरकारवर कर्जबाजारीपणाचा आरोप, विधानसौधसमोरून काढला मोर्चा

SCROLL FOR NEXT