मुंबई

नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरीस

CD

नंदिग्राम एक्स्प्रेसमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरीस
ठाणे लोहमार्ग पोलिसांत तक्रार; ३२ हजारांचा मोबाईल गायब
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : मुंबईकडे येणाऱ्या नंदिग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या एका तरुण प्रवाशाचा चार्जिंगला लावलेला मोबाईल फोन चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे ३२ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरीस गेल्याने प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर या घटनेमुळे रेल्‍वेतील असुरक्षित प्रवास पुन्‍हा एकदा समोर आला आहे.
मुंबईतील वरळी येथे राहणारे अनंकथ आशन्ना कार्तिक (वय २५) हे मुंबईतील एका बँकेत कार्यरत आहेत. पोंगल सणानिमित्त ते मंगळवारी (ता. १३) आपल्या मूळ गावी आदिलाबाद (तेलंगणा) येथे गेले होते. सणानंतर रविवारी (ता. १८) दुपारी १२.४० वाजता त्यांनी आदिलाबाद रेल्वे स्थानकावरून नंदिग्राम एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रवास सुरू केला. ते एस-३ कोचमधील सीट क्रमांक ४७ वरून प्रवास करत होते. सोमवारी (ता. १९) पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास नंदिग्राम एक्स्‍प्रेस कल्याण रेल्वे स्थानकात थांबली. त्या वेळी कार्तिक यांनी आपला मोबाईल फोन सीटजवळील चार्जिंग पॉइंटला लावून झोप घेतली. मात्र, गाडी ठाणे रेल्वे स्थानकात थांबून पुढे निघाल्यानंतर सुमारे ४. ३५ वाजता त्यांना जाग आली असता चार्जिंगला लावलेला मोबाईल फोन जागेवर आढळून आला नाही.
तत्काळ शोध घेतल्यानंतरही मोबाईल सापडला नसल्याने कार्तिक यांनी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, रेल्वे प्रवासादरम्यान चार्जिंग पॉइंटजवळ मोबाईल ठेवून झोप घेणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे प्रवाशांनी अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT