कलाधी कला मंदिरतर्फे ‘नृत्य उत्सव २०२६’चे आयोजन
कथ्थक नृत्याच्या ताल, भक्ती आणि कथनशैलीचा सुरेल आविष्कार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : ठाणे येथील कलाधी कला मंदिर या कथ्थक शास्त्रीय नृत्यसंस्थेतर्फे वार्षिक नृत्यप्रस्तुती ‘नृत्य उत्सव २०२६’ चे आयोजन शनिवार, २५ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे करण्यात आले आहे. शास्त्रीय नृत्यप्रेमींसाठी हा कार्यक्रम एक कलात्मक पर्वणी ठरणार आहे.
कलाधी कला मंदिरची स्थापना २०२१ मध्ये संस्थेच्या संस्थापिका हर्षिता हाटे यांनी केली. हर्षिता हाटे या नृत्य अलंकार, कथ्थक विषयातील पदव्युत्तर पदवीधारक असून, दूरदर्शन मान्यताप्राप्त कलाकार आहेत. भारतीय शास्त्रीय नृत्यकलेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करणे, तसेच नव्या पिढीला शास्त्रीय कलेशी जोडणे, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. ‘नृत्य उत्सव २०२६’ या कार्यक्रमात कलाधी कला मंदिरातील विद्यार्थ्यांकडून कथ्थक नृत्यप्रकारातील विविध अंगांचे प्रभावी सादरीकरण करण्यात येणार आहे. ताल, लय, भावाभिव्यक्ती, भक्तीरस तसेच कथनशैली यांचा सुरेख संगम या नृत्यप्रस्तुतीत अनुभवता येणार आहे. गुरू-शिष्य परंपरेचा ठसा जपत विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत आणि साधना या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमास आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे तसेच नगरसेवक पवन कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा नृत्य उत्सव अधिकच रंगतदार ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शास्त्रीय नृत्यकलेची आवड असलेल्या रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन कलाधी कला मंदिरतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.