मुंबई

राष्ट्रीय स्टँडअप पॅडल चॅम्पियनशिप संपन्न

CD

राजोडीच्या सागरी पर्यटनाला उभारी
‘स्टँड अप पॅडल’ स्पर्धेत१०० स्पर्धक सहभागी
विरार, ता.२१(बातमीदार)ः मुंबई सर्फ क्लबने महाराष्ट्राच्या सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘स्टँड अप पॅडल’ चॅम्पियनशिप स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली. विविध राज्यांतील १०० हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.
पालघरच्या सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई सर्फ क्लबने विविध प्रकारच्या स्टँड अप पॅडल हा जलक्रीडेचा प्रकार राबवली आहे. पालघर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी विशाल खत्री, वसई विरार शहर महापालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील, महाराष्ट्र खो-खो फेडरेशन अध्यक्षा ग्रीष्मा पाटील तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे कॅप्टन लेपांडे यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी महापौर राजीव पाटील यांनी उपक्रमामुळे सागरी पर्यटनाची विशेष ओळख निर्माण केली. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढेल, असे प्रतिपादन केले. स्पर्धेसाठी उपजिल्हाधिकारी विशाल खत्री आणि प्रथम महापौर राजीव पाटील यांनी हिरवा कंदील दाखवला. तर चेन्नई येथून आलेले सर्फिंग फेडरेशनचे जेहान ड्रायव्हर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
-------------------------------
विजेत्यांचे कौतुक
राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये शेखर पिचाई यांनी गोल्ड मेडल जिंकले. तर १४ वर्षीय आरतीने ३ सुवर्ण पदके मिळवत इतिहास रचला. महाराष्ट्रमधून मनोज कुंभार सिद्धि वनमाळी तसेच अलिना जोशी यांनी अनुक्रमे सुवर्ण, रजत, कास्य पदक पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Congress Conflict: कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसमोरच "डीके, डीके"च्या घोषणा; काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पुन्हा उघड!

RTE Admission : आरटीई २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी शाळा नोंदणीसाठी ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Muralidhar Mohol : पुण्यात भाजप गटनेतेची निवड दोन दिवसांत ठरणार

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत ६५ वर्षांवरील १५५३० आजीबाई अन्‌ २१ वर्षांखालील ३२८२ तरुणी; ९८ हजार महिलांची चुकली ‘ई-केवायसी’; अंगणवाडी सेविका पुन्हा घरोघरी

Arijit Singh Retirement : अरिजीत सिंहचा मोठा निर्णय! ‘Playback Singing’ मधून अचानक ‘रिटायरमेंट’ ; लाखो चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT