मुंबई

अलिबागच्या हापूसची पेटी एपीएमसी बाजारात दाखल

CD

अलिबागच्या हापूसची पेटी एपीएमसी बाजारात दाखल
पोयनाड, ता. २१ (बातमीदार) : फळांचा राजा असलेला हापूस आंब्याचा हंगाम आता सुरू होईल. बाजारपेठेत सर्वत्र लोकप्रिय असलेल्या आणि चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागच्या हापूस आंब्याची यंदाच्या हंगामातील पहिली पेटी वाशी येथील एपीएमसी बाजारात नुकतीच दाखल झाली आहे. अलिबाग तालुक्यातील पोयनाड परिसरात असलेल्या केतकीचा मळा गावातील आंब्याचे उत्पादक गौरव पाटील यांच्या बागेतील हापूस आंब्याच्या दोन पेट्या एपीएमसी बाजारात दाखल झाल्या आहेत. गौरव पाटील यांना यंदाच्या हंगामातील पहिली आंब्याची पेटी एपीएमसीत पाठविण्याचा मान मिळाला आहे.
सध्या रत्नागिरी आणि देवगड या लोकप्रिय हापूस आंब्यासह अलिबागच्या हापूस आंब्याचीही लोकप्रियता ग्राहकांमध्ये आहे. इतकच नव्हे तर अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातील आंबा आता देश-विदेशातही पोहोचू लागला आहे. अलिबाग तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो, पण आता आंबा उत्पादन आणि त्यात समाविष्ट होत चाललेले अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे तरुणवर्ग या आंब्याच्या उत्पादनाकडे वळला आहे.
यंदा अगदी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने हजेरी लावल्याने आंबा उत्पादन किंवा आंब्याचे पीक कसे टिकून राहील, अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. मात्र, योग्य वेळी फवारणी कशी करावी आणि आंब्याच्या पिकाची निगा कशी राखावी, यासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी योग्य असे मार्गदर्शन केले. तसेच योग्यपणे देखभाल आणि मेहनत घेतली गेली आणि या सर्व मेहनतीचे फळ म्हणून आंब्याच्या दोन पेट्या वाशी येथील एपीएमसी बाजारात दाखल झाल्याची माहिती केतकीचा मळा येथील आंबा शेतकरी गौरव पाटील यांनी सांगितले आहे.

़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
छायाचित्र :
पोयनाड : केतकीचा मळा येथील आंबा उत्पादक शेतकरी गौरव पाटील यांच्या बागेतील दोन पेट्या एपीएमसीत दाखल झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT