लोकसंगीतातील सारंगीचे सूर हरपले
ग्रामीण लोककला नामशेष होण्याच्या मार्गावर
विक्रमगड, ता. २१ (बातमीदार) ः सण, उत्सव, यात्रा, धार्मिक कार्यक्रमात घुमणारा सारंगीचा नाद आता क्वचितच ऐकायला मिळत आहे. त्यामुळे भारूड, भजन, कीर्तन, लोकनाट्य, नृत्यसादरीकरणातून ग्रामीण लोककलेची ओळख असलेल्या सारंगीचे (कोका) सूर हरपल्याचे दिसत आहे.
मानवी आवाजाशी जवळीक साधणारे तंतुवाद्य ग्रामीण लोकगायनाला भावपूर्ण साथ देणारे प्रमुख वाद्य म्हणून ओळखले जात होते. ग्रामीण भागातील शाहीर, भारूडकार, भजनी मंडळी सादरीकरणात सारंगीचा वापर आवर्जून करतात. धार्मिक कार्यक्रम, जत्रा, सांस्कृतिक मेळाव्यात या वाद्याला मानाचे स्थान होते; मात्र बदलत्या काळात लोकसंगीताच्या सादरीकरणात मोठे बदल झाले आहेत. हार्मोनियम, ढोलकी, तबला तसेच इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या वाढत्या वापरामुळे सारंगी मागे पडली आहे. सारंगी वादनासाठी आवश्यक असलेला दीर्घकालीन रियाज, कष्टदायक सरावाच्या अभावामुळे तरुण पिढी या वाद्याकडे फारशी आकर्षित होत नसल्याचे चित्र आहे. अभ्यासकांच्या मते, सारंगी हे केवळ वाद्य नसून ग्रामीण जीवनशैली, श्रद्धा, सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. शासनाने विशेष प्रशिक्षण शिबिरे, सांस्कृतिक महोत्सव, मानधन योजनेतून वाद्याला नवसंजीवनी देण्याची गरज आहे.
----------------------------------------------
वाद्यनिर्मिती संकटात
- ग्रामीण भागातील काही ज्येष्ठ सारंगीवादक आजही ही कला जिवापाड जपत आहेत; मात्र बदलती आवड, कमी कार्यक्रम, आर्थिक असुरक्षितता, योग्य व्यासपीठाच्या अभावामुळे ही परंपरा पुढे नेणे कठीण जात आहे. तसेच पारंपरिक कारागीरही कमी झाल्याने वाद्यनिर्मिती संकटात सापडली आहे.
- लोककलेचा आत्मा जपणारी सारंगी वाद्यपरंपरा टिकवण्यासाठी समाज, शासन, कलावंतांनी एकत्र येऊन पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे, अन्यथा हा मधुर नाद केवळ आठवणीमध्ये राहू नये, अशी भावना सारंगीवादक काळू चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.