मुंबई

झाडू हातात घेऊन नगराध्यक्षा रस्त्यावर

CD

बदलापूर, ता. २१ (बातमीदार) : मुंबई विद्यापीठाच्या एनएसएस विभागाच्या पुढाकाराने भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत बदलापूर रेल्वे स्थानक आणि परिसरात मंगळवारी (ता. २०) व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षाही हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या.
आरोग्य योगा नेचरोपॉथी इन्स्टिट्यूट, जीवन फाउंडेशन, निर्भीड पत्रकार संघ आणि जन्मदा आय अँड मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर येथील १२ महाविद्यालयांमधील सुमारे १२५ एनएसएस स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्थानक व परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी केले. विशेष म्हणजे नगराध्यक्षांनीही स्थानक परिसर स्वच्छ करण्यासाठी हातात झाडू घेतल होता. या वेळी नगराध्यक्षांनी स्वयंसेवकांचे कौतुक करत भविष्यात बदलापूर स्थानकाला मध्य रेल्वेतील सर्वांत स्वच्छ स्थानक बनवण्याचे निर्धार व्यक्त केले. कार्यक्रमाला आरोग्य योगा नेचरोपॉथी इन्स्टिट्यूटचे डॉ. विजय कुकरेजा, एनएसएस ठाणे जिल्हा समन्वयक डॉ. जीवन विचारे, निर्भीड पत्रकार संघाचे संजय कदम, तसेच विविध महाविद्यालयांचे एनएसएस प्रोग्राम अधिकारी व विभाग समन्वयक नीरज मिश्रा यांचा विशेष सहभाग होता.

स्वयंसेवकांना प्रशस्तिपत्र
भाजप कोकण विभाग आयटी सेलप्रमुख डॉ. मिलिंद धारवाडकर यांनी देशातील युवक शक्ती स्वच्छता व राष्ट्रनिर्माणात कशी योगदान देऊ शकते हे अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी २ ऑक्टोबरला झालेल्या स्वच्छता मोहिमेत सहभागी स्वयंसेवकांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बदलापूर स्थानक व्यवस्थापक धनश्री गोडे यांनी सर्व आयोजक व स्वयंसेवकांचे आभार मानले.

बदलापूर : स्थानक परिसराच्या स्वच्छतेसाठी नगराध्यक्षांनीही हातात झाडू घेतला होता.
बदलापूर : स्वच्छता मोहिमेत सहभागी स्वयंसेवकांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

SCROLL FOR NEXT