नमुंमपा पोषण पुनर्वसन केंद्रातून बालकांचे आरोग्य सुधार
नेरूळ, ता. २१ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी तुर्भे येथील रामतनु माता बाल रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामार्फत तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांची तपासणी, वैद्यकीय उपचार व पोषण पुनर्वसन सेवा दिली जाते.
केंद्र सुरू झाल्यापासून आतापर्यंत २ बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका बालकात तीव्र कुपोषण, तर दुसऱ्या बालकात मध्यम कुपोषण असल्याचे निदान झाले असून, दोघांची प्रकृती स्थिर आहे.
तुर्भे सोबतच वाशी, नेरूळ व ऐरोली सार्वजनिक रुग्णालयांमार्फत १२८ तीव्र आणि ७१३ मध्यम कुपोषित बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. गरजेनुसार आहार व इतर पोषणात्मक मदत दिली जाते.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियमित पोषण व आरोग्य शिबिरे घेऊन कुपोषणमुक्त बालक घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे, तसेच पोषण पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी सातत्यपूर्ण उपाययोजना राबविली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.