मुंबई

नवी मुंबईत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजन

CD

नवी मुंबईत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजन
नेरूळ, ता. २१ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी दि. १४ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. ‘अभिजात मराठी – अभिमान मराठी’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमांत विविध साहित्यिक, सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पंधरवड्याची सुरुवात दि. २१ जानेवारी २०२६ (बुधवार) सायं. ४ वा. आगरी साहित्यिक गजानन म्हात्रे यांच्या ‘आंगरू डुंगरू’ अर्थात आगरी भाषा सौंदर्य या विशेष कार्यक्रमाने होणार आहे. त्यानंतर दि. २३ जानेवारी २०२६ (शुक्रवार) सकाळी ११ वा. महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार तथा निवृत्त संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग सुरेश वांदिले यांचे ‘कार्यालयीन मराठी लेखन आणि नव्या पिढीची मराठी’ या विषयावर व्याख्यान होईल.
दि. २७ जानेवारी २०२६ (मंगळवार) सकाळी ११ वा. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘वाचन कट्टा’ संकल्पनेचे अध्वर्यू युवराज कदम यांचा ‘वाचाल तर वाचाल’ हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच दि. २८ जानेवारी २०२६ (बुधवार) सकाळी ११ वा. प्रसिद्ध गझलकार मा. आप्पा ठाकूर यांचा मराठी गझलांचा हृदयस्पर्शी कार्यक्रम ‘गुंतलेले पाश’ सादर होणार आहे.
पंधरवड्याच्या समारोपाच्या दिवशी दि. २८ जानेवारी २०२६ (बुधवार) सायं. ४ वा. मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ‘मला आवडलेले मराठी पुस्तक’ या विषयावर मनोगत स्पर्धा (५ मिनिटे सादरीकरण) तसेच ‘शब्दकोडे स्पर्धा’ आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धा अधिकारी, कर्मचारी व साहित्यप्रेमी नागरिकांसाठी खुल्या आहेत. स्पर्धेनंतर त्याच ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
सर्व कार्यक्रमांचे आयोजन ज्ञानकेंद्र, तिसरा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे करण्यात आले आहे. मराठी भाषेचा अभिमान आणि संवर्धन वृद्धिंगत करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT