मुंबई

युवकांनी जीवनाला दिशा द्यावी, केवळ पैसा-प्रतिष्ठाच उद्दिष्ट नको : अमृत बंग

CD

युवकांनी जीवनाला दिशा द्यावी, केवळ पैसा-प्रतिष्ठाच उद्दिष्ट नको : अमृत बंग
ठाणे, ता. २१ (बातमीदार) : ठाणे येथील जोशी-बेडेकर स्वायत्त महाविद्यालयात आयोजित डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेतील ४८वे पुष्प बुधवारी (ता. २१) युवा सामाजिक कार्यकर्ते तथा गडचिरोली येथील सर्च फाउंडेशनच्या ‘निर्माण’ प्रकल्पाचे संचालक अमृत बंग यांनी गुंफले. “राष्ट्र परिवर्तन : युवकांसाठी-युवकांकडून” या विषयावर त्यांनी प्रभावी व्याख्यान दिले.
अमृत बंग यांनी गडचिरोली येथील सर्च फाउंडेशनच्या कार्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. ‘निर्माण’ प्रकल्पांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या मासिक शिबिरांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडतो, तसेच या शिबिरांमधून घडलेले अनेक तरुण आज समाजपरिवर्तनाचे काम कसे करत आहेत, याची उदाहरणे त्यांनी मांडली. आजचा युवावर्ग पैसा आणि प्रतिष्ठेच्या मागे धावत असल्याची खंत व्यक्त करत, युवकांनी स्वतःच्या जीवनाचे स्पष्ट ध्येय निश्चित करावे आणि त्या दिशेने सातत्याने वाटचाल करावी, असा सल्ला त्यांनी दिला. केवळ चांगले पॅकेज मिळवणे हेच आयुष्याचे अंतिम ध्येय नसावे, तर समाजासाठी काहीतरी सकारात्मक आणि भरीव योगदान देणे हेच खरे यश असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुचित्रा नाईक यांनी सर्च फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. अमृत बंग यांनी व्याख्यानात मांडलेल्या सूचनांचा उल्लेख करत, भविष्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या शिबिरांमध्ये सहभागी करून घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मानसी जंगम यांनी केले. या व्याख्यानाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर व सदस्य डॉ. महेश बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : इराणवर भारतीय तळांवरून हल्ले? अमेरिकन कर्नलच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन, काय आहे सत्य?

'शुटिंग करताना अचानक मोठे स्फोट झाले अन्...' दुबईत अडकलेल्या लारा दत्तने सांगितला भंयकर प्रसंग, सत्य परिस्थिती सांगताना अश्रू अनावर

Date Prices Rise : रमजानच्या पार्श्वभूमीवर सांगलीत खजुरांना मोठी मागणी; दरात १० टक्क्यांची वाढ, बाजारात विविध देशांतील खजूर उपलब्ध

Healthy Laddu Recipe: साखर न वापरताच बनवता येतात 'हे' लाडू; लहानांपासून मोठ्यांपर्यंत अन् डायबेटिक पेशंटही खाऊ शकतील

Sugarcane Field Fire Tragedy : उसाच्या फडात होरपळून वृद्धाचा मृत्यू, शेतातील गवत पेटविताना घडला प्रकार, पलूस तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT