मुंबई

रस्ता सुरक्षेसाठी ‘ठाणे कार्निव्हल’

CD

रस्ता सुरक्षेसाठी ‘ठाणे कार्निव्हल’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्‍घाटन; ई-वाहने, सुपर बाक्स व व्हिन्टेज वाहनांचे आकर्षण
ठाणे, ता. २१ (बातमीदार) : रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ठाणे पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ‘ठाणे कार्निव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य कार्निव्हलचे उद्‍घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, प्रजासत्ताकदिनापासून साकेत पोलिस परेड मैदानात तीन दिवस हा कार्यक्रम रंगणार आहे.
ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशानुसार आणि सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान-२०२६ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ‘ठाणे कार्निव्हल’मध्ये वाहतूक नियमांच्या पालनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्निव्हलमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी सर्जनशीलता वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन नागरिकांना पाहता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी साकारलेले वाहतूकविषयक कल्पक प्रकल्प, अम्युझमेंट पार्कच्या माध्यमातून वाहतूक नियमांवरील खेळ, तसेच रस्त्यांवरील वाहतूक चिन्हांचे प्रत्यक्ष आकलन करून देणारे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
कार्निव्हलच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त ईव्ही (विद्युत) वाहनांचे सादरीकरण होणार असून, टाटा, बीएमडब्ल्यू, व्होल्वो, ऑडी, जॅग्वार, मर्सिडीज, एमजी, ह्युंडाई यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या सुमारे ३० प्रकारच्या वाहनांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या वाहनांची किंमत १० लाखांपासून तब्बल एक कोटी रुपयांपर्यंत आहे. तिसऱ्या दिवशी सुपर बाइक्ससह अनेक व्हिन्टेज मोटारी व दुचाकी वाहनांचे भव्य प्रदर्शन रसिकांसाठी खुले असणार आहे. रस्ता सुरक्षेचा प्रभावी संदेश देत मनोरंजन व जनजागृती यांचा संगम साधणारा ‘ठाणे कार्निव्हल’ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळवेल, असा विश्वास ठाणे पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
...........
कोट
प्रत्येकाला आपले वाहन प्रिय असते. त्यानुसार प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे वाहनांची देखभाल करीत असतो. मात्र, एखादी चूक अथवा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातग्रस्त होऊन वाहनाची दुर्दशा होते. तेव्हा वाहनांचा वापर विनाअपघात तसेच काळजीपूर्वक केल्यास वाहन वर्षानुवर्षे टिकून व्हिन्टेज बनू शकते. अशा कार्निव्हलच्या माध्यमातून अपघात टाळा, वाहन व्हिन्टेज बनवा, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
- पंकज शिरसाट, उपआयुक्त, ठाणे वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड होणार! २००० रुपये खात्यात जमा, २२वा हप्ता देत पंतप्रधानांचे मोठं वक्तव्य

बिग बॉस नंतर आयुष संजीवची नवी इनींग ! 'या' गाण्याचं केलं दिग्दर्शन आणि कोरियोग्राफी

Fridge Vastu Tips: फ्रिजच्यावर 'या' 3 गोष्टी ठेवू नका, अन्यथा निर्माण होतात वास्तुदोष

Latest Marathi News Live Update : परळीच्या धारावती तांड्यावर 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना

Akola News: बहिणीच्या विरहात भावाचा जीव गेला; अंत्यसंस्कारानंतरच हृदयविकाराचा झटका

SCROLL FOR NEXT