मुंबई

सूक्ष्मजीवांच्या चालींचे अचूक अनुकरण करणारे रोबोटिक मॉडेल विकसित

CD

रोबोटिक मॉडेलद्वारे सूक्ष्मजीवांच्या हालचालींचा वेध
आयआयटी मुंबई, आयआयटी मंडीचे संयुक्त संशोधन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : द्रव माध्यमातील सूक्ष्मजीव हालचाली कशा करतात, त्यामागील भौतिक तत्त्वे कोणती आहेत आणि त्या हालचाली कृत्रिमरीत्या निर्माण करता येतील का, याबाबत आयआयटी मुंबई आणि आयआयटी मंडी येथील संशोधकांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. संशोधकांनी यातून सूक्ष्मजीवांच्या ‘रन-अँड-टंबल’ या वैशिष्ट्यपूर्ण गतीचे हुबेहूब अनुकरण करणारे आणि स्वयंस्फूर्तीने हालचाल करणारे पहिले रोबोटिक मॉडेल विकसित केले आहे.
रोबोटिक प्रणालीमध्ये कोणतीही जलगतिक (हायड्रोडायनॅमिक) परस्परक्रिया नसतानाही सूक्ष्मजीवांप्रमाणेच ‘रन’ आणि ‘टंबल’ अशा अवस्था नैसर्गिकरीत्या निर्माण होतात. त्यातूनच लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत सजीवांनी विकसित केलेल्या अशा कार्यक्षम हालचालींचे अनुकरण करण्याला ‘बायोमिक्री’ किंवा जैव अनुकरण म्हणतात. या तत्त्वाचा वापर करीत संशोधकांनी रोबोटिक प्रणाली विकसित केली असल्याचे सांगण्यात आले.
----
रन अँड टंबल म्हणजे काय?
जीवाणू, शैवाल यांसारखे अनेक सूक्ष्मजीव एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी ‘रन-अँड-टंबल’ ही हालचाल वापरतात. या प्रक्रियेत सूक्ष्मजीव काही काळ सरळ रेषेत पोहत राहतो. या अवस्थेला ‘रन’ असे म्हटले जाते. त्यानंतर अचानक हालचाल विस्कळित होऊन जीवाची दिशा झपाट्याने बदलते. ही अवस्था म्हणजे ‘टंबल.’ अशा प्रकारे सतत धावणे आणि दिशाबदल करीत हे सूक्ष्मजीव अन्न, प्रकाश किंवा अनुकूल परिस्थितीच्या दिशेने पुढे सरकत राहतात.
----
उपयोग काय?
रोबोटिक प्रणालीमुळे स्वयंप्रेरित सूक्ष्मयंत्रे (मायक्रो मशिन्स) विकसित करण्याच्या दिशेने नवे दालन खुले झाले आहे. भविष्यात आरोग्य क्षेत्रात औषध पोहोचवणारी सूक्ष्मयंत्रे, कृत्रिम जैव प्रणाली आणि ॲक्टिव्ह मॅटरवरील संशोधनासाठी हे निष्कर्ष अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. सूक्ष्मजीवांच्या हालचालींमागील मूलभूत भौतिकशास्त्र समजून घेण्याच्या दृष्टीने हे संशोधन मैलाचा दगड ठरते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT