मुंबई

घर, उपजिविका एकत्र असलेले शहर म्हणून धारावीची ओळख होईल

CD

घर, उपजीविका एकत्र असलेले शहर म्हणून धारावीची ओळख होईल
डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचा विश्वास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून आगळेवेगळे शहर उभे राहणार असून त्याची ओळख घर आणि उपजीविका एकत्र असलेले आधुनिक शहर म्हणून निर्माण होईल, असा विश्वास धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. महेंद्र कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे.
धारावी आता आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून नव्हे, तर परवडणारी घरे, जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले नियोजनबद्ध शहर होणार आहे. तसेच स्वच्छ परिसर, सन्मानाचे घर, समान संधी, सुरक्षितता आणि रोजगार यासाठी हा पुनर्विकास महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
वर्षानुवर्षे झोपडपट्टीत राहणाऱ्या धारावीकरांसाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. लाखो लोकांशी निगडित असणारा हा प्रकल्प राबवताना धारावीकरांची वैयक्तिक इच्छा आणि राजकीय निष्ठा यांची गल्लत होता कामा नये. या दोन गोष्टी कधीच समान नसतात. राजकीय निष्ठा ही स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या हिताच्या आड येऊ शकत नाही.
धारावीतील सुमारे १.२५ ते १.५० लाख कुटुंबांपैकी ९० हजारांहून अधिक कुटुंबांनी घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. हाच या प्रकल्पाला मिळालेला सर्वात मोठा पाठिंबा असल्याचे डाॅ. महेंद्र कल्याणकर यांनी स्पष्ट केले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशाच्या इतिहासातील सर्वांत समावेशक आणि सर्वांगीण शहरी पुनर्निर्माण प्रकल्प आहे. प्रत्येक पात्र, प्रामाणिक झोपडपट्टीधारकाला नवीन घर मिळणार आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या तत्त्वावर आधारित हा प्रकल्प धारावीला एक सशक्त, शाश्वत आणि समावेशक शहरी वसाहत म्हणून उभी करणार आहे.
मुंबईला झोपडपट्टीमुक्त शहर बनवण्याच्या राज्य सरकारच्या उद्दिष्टाच्या दिशेने हा एक मोठा टप्पा असल्याचेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत १ जानेवारी २००० पूर्वी धारावीत वास्तव्यास असलेल्या पात्र रहिवाशांना धारावीतच ३५० चौरस फुटांची घरे मिळत होती. तर अंतिम तारखेनंतर आलेल्या अपात्र रहिवाशांना मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) धारावीबाहेर ३०० चौरस फुटांची घरे देण्याची तरतूद होती. हे आता पूर्णपणे दूर करण्यात आले आहे. पुनर्विकासासाठी पात्र ठरणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला, पात्रतेची अट न पाहता, ३५० चौरस फुटांचे नवे घर मिळणार आहे.

पात्र-अपात्रांना घरे देणारा पहिलाच प्रकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीतील सर्व कुटुंबांसाठी ३५० चौरस फुटांची घरे जाहीर केली आहेत. घरांच्या आकाराचे हे एकसमान धोरण पारंपरिक झोपडपट्टी पुनर्विकासाच्या संकल्पनांपासून मोठा आणि ऐतिहासिक बदल आहे. यामुळे समानता आणि समावेशक विकासाला नवी दिशा मिळाली आहे. पात्र आणि अपात्र अशा दोन्ही प्रकारच्या रहिवाशांचा पुनर्वसनात समावेश करणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.

सात वर्षांत दीड लाख घरे
पुढील सात वर्षांत सुमारे १.२५ ते १.५० लाख कुटुंबांना पात्रतेनुसार नवी घरे दिली जातील. ही घरे सुरक्षित, मजबूत आणि आरोग्यदायी जीवनासाठी उभारण्यात येणार आहेत. कुटुंबांना कोंडलेल्या, असुरक्षित घरांमध्ये राहावे लागणार नाही. प्रकाश, हवा आणि सुरक्षित छप्पर असलेले सन्मानाचे आयुष्य त्यांना मिळेल, असे कल्याणकर यांनी स्पष्ट केले.

रहिवाशांवर कोणताही भार नाही
पुनर्विकासानंतर येथे उभ्‍या राहणाऱ्या इमारतींची देखभाल पहिल्या १० वर्षांसाठी एनएमडीपीएलकडून केली जाणार असल्याने रहिवाशांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. तसेच प्रत्येक टाउनशिपमधील १० टक्के क्षेत्र व्यापारी वापरासाठी विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांना कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत मिळेल. प्रत्येक सदनिकेसाठी वैधानिक कॉर्पस निधी सक्षम प्राधिकरणाकडे जमा केला जाईल.

अत्याधुनिक शिक्षण संकुल
पुनर्विकासांतर्गत धारावीतील शाळांचा दर्जा उंचावण्यात येणार आहे. ३६ सरकारी आणि २५ खासगी शाळा एकत्र करून अत्याधुनिक शिक्षण संकुले उभारली जातील. स्वच्छ आणि सुसज्ज वर्गखोल्यांमध्ये शिक्षण मिळेल.

धारावीकरांना काय मिळणार?
- आरोग्य सुविधांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, प्रसूती सेवा, दवाखाने आणि रुग्णालये उभारली जातील.
- ५०० हून अधिक धार्मिक स्थळांचे पुनर्नियोजन केले जाईल.
- महाराष्ट्र निसर्ग उद्यान ते माटुंगा यांना जोडणारा हरित मार्ग, मोठे मध्यवर्ती उद्यान आणि जवळपास १०० एकर मोकळी व हिरवी जागा धारावीला आरोग्यदायी बनवेल.
- मिठी नदी स्वच्छ करून जैवविविधतेसह नदीकिनाऱ्यांचादेखील विकास केला जाईल.
- धारावीत सुमारे २० हजार लघुउद्योगांना अधिक चांगल्या कामाच्या जागा मिळणार असल्याने सुमारे १.५ लाख कामगारांना आधार मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT