मुंबई

पालघर–बोईसर रस्त्यावर ठिय्या आंदोलन, तणावाचे वातावरण

CD

तीन महिन्यांसाठी आंदोलन स्थगित
पालघरमध्ये मोर्चा; आठ तासांच्या बैठकीनंतर निर्णय
पालघर, कासा, ता. २१ (बातमीदार) : वाढवण व मुरबे बंदर रद्द करण्याची आमची प्रमुख मागणी आहे. हे निर्णय जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत नसले तरी मोर्चेकऱ्यांच्या भावना केंद्र सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच देवस्थान इनाम कायदा येत्या विधानसभेत मांडला जाईल, अशी माहितीही या वेळी देण्यात आली. तसेच पुढील चर्चेसाठी आणि सकारात्मक निर्णयाच्या अपेक्षेने हे आंदोलन तीन महिन्यांसाठी स्थगित ठेवण्यात आले आहे.

विविध प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मोर्चा बुधवारी उशिरा रात्रीपर्यंत सुरू होता. १९ जानेवारीला चारोटी येथून निघालेला हा मोर्चा पहिल्या दिवशी मनोरपर्यंत पोहोचला. त्यानंतर २० जानेवारीला मनोर येथून पुढे निघालेला मोर्चा सायंकाळी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला. मोर्चेकऱ्यांची संख्या मोठी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संतप्त मोर्चेकऱ्यांनी पालघर-बोईसर मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भावना केंद्र सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन
दुपारी सुमारे १२ वाजता जिल्हा प्रशासनाकडून मोर्चेकऱ्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले. जिल्हाधिकारी इंदुमती जाखड यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेली ही बैठक तब्बल आठ तास चालली. या बैठकीस पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, आमदार विनोद निकोले तसेच मोर्चाचे प्रमुख नेते अशोक ढवळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर अशोक ढवळे यांनी सांगितले, की वाढवण व मुरबे बंदर रद्द करण्याची आमची प्रमुख मागणी आहे. हे निर्णय जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत नसले तरी मोर्चेकऱ्यांच्या भावना केंद्र सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच देवस्थान इनाम कायदा येत्या विधानसभेत मांडला जाईल, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.

तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू
प्रशासनाकडून सहकार्य लाभल्याचे सांगत ढवळे यांनी स्पष्ट केले, की केंद्र व राज्य सरकारविरोधातील आमची भूमिका कायम राहणार आहे. मात्र पुढील चर्चेसाठी आणि सकारात्मक निर्णयाच्या अपेक्षेने हे आंदोलन तीन महिन्यांसाठी स्थगित ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, मागण्यांवर ठोस व सकारात्मक निर्णय होईपर्यंत आंदोलनाची धार कायम ठेवण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला असून, प्रशासनाकडून पुढील संवाद व तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : कल्याण मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT