कल्याण-डोंबिवलीत परिवर्तनाचे वारे
महापालिकेत ५२ ‘नव्या दमाचे’ शिलेदार
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी यंदा प्रस्थापितांना धक्का देत नव्या चेहऱ्यांना मोठी पसंती दिली आहे. एकूण १२२ जागांपैकी तब्बल ५२ जागांवर पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे उमेदवार विजयी झाले असून, मतदारांनी शहराच्या विकासासाठी नवीन पर्वाची सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.
निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती ‘जायंट किलर’ ठरलेल्या नव्या उमेदवारांची. राजकारणात नवख्या असलेल्या अपर्णा भोईर यांनी माजी महापौर वैजयंती घोलप यांचा पराभव करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच, दुसरा मोठा धक्का मधुर म्हात्रे यांनी दिला; त्यांनी माजी उपमहापौर विकी तरे यांचा पराभव करत महापालिकेत दिमाखात प्रवेश केला आहे. निवडणुकीत महायुतीसह सर्वच पक्षांनी तरुण आणि सुशिक्षित चेहऱ्यांना संधी दिली होती.
नवख्या महिलांकडे सोपविले नेतृत्व
अनघा देवळेकर, तेजश्री गायकवाड, डॉ. तनुजा वायले, अपर्णा भोईर, स्वप्नाली केणे, माया कांबळे, दर्शना काळे, शामल गायकर, हेमलता पवार, समीना शेख, कांचन कुलकर्णी, मेघाली खेमा, रेश्मा निचळ, हर्मेश शेट्टी, सरिता निकम, ऐश्वर्या तांबोळी, स्नेहल मोरे, कीर्ती ढोणे, पूजा गायकवाड, सरोज राय, वंदना महिले, प्रणाली जोशी, कैलास जोशी, रंजना पेणकर, आसावरी नवरे, रविना म्हात्रे, डॉ. रसिका पाटील, मृदुला नाख्ये, कविता म्हात्रे, आर्या नाटेकर, विजेयश्री म्हात्रे, सविता भोईर, स्नेहा भाने, पूजा म्हात्रे आदींचा समावेश आहे.
सुशिक्षित चेहऱ्यांना संधी
राहुल कोट, रोहन कोट, रूपेश सकपाळ, किरण भांगळे, संकेश भोईर, विशाल गारवे, गणेश लांडगे, रमीझ मणियार, अमित धाक्रस, मधुर म्हात्रे, नीलेश खंबायत, अभिजित थरवळ, हर्षल मोरे, सूरज मराठे, प्रल्हाद म्हात्रे, संदेश पाटील, समीर चिटणीस.
विकासाची नवी आशा
निवडून आलेले हे ५२ नवीन नगरसेवक आता आपल्या प्रभागातील रस्ते, पाणी, आरोग्य आणि कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न कसे हाताळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनुभवी नगरसेवकांच्या जोडीला आता ही ‘नव्या दमाची’ फळी आल्याने महापालिकेच्या कामकाजात चैतन्य येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.