नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : बतावणी करून ज्येष्ठ नागरिक व महिलांना लुबाडणाऱ्या दोघांनी सानपाडा येथील एका महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्याजवळचे पावणेसात लाखांचे दागिने लुबाडून नेल्याची घटना मंगळवारी (ता. २०) सकाळी घडली. सानपाडा पोलिसांनी या घटनेतील दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रमिला अग्रहारी (वय ६८) या सानपाडा सेक्टर ३० परिसरात राहण्यास आहेत. मंगळवारी त्या नवदौलत सोसायटीसमोरील रस्त्यावरून चालत जात होत्या. या वेळी त्यांच्याजवळ आलेल्या दोघांनी पुढे रेशन वाटण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच गरीब दिसावे, यासाठी त्यांना अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. प्रमिला यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या गळ्यातील सोन्याची चेन, त्याचप्रमाणे सोन्याच्या दोन बांगड्या काढून पिशवीत ठेवण्याचा प्रयत्न केला. याच वेळी दोघांनी त्यांचे दागिने व्यवस्थित पिशवीमध्ये ठेवण्याचा बहाणा करून त्यांचे दागिने हातचलाखीने काढून घेतले. त्यानंतर रिकामी पिशवी त्यांच्या हातात देऊन त्या ठिकाणावरून पलायन केले. काही वेळानंतर अग्रहारी यांनी पिशवी तपासली असता, त्यात दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.