आरोग्यसेवेला बळकटी
आचोळेतील रुग्णालयाची निविदा प्रक्रिया सुरू
पालघर, ता. २२ ः वसई-विरार पालिका क्षेत्रातील आचोळे येथे चारशे खाटांच्या रुग्णालय उभारणीसाठीच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भविष्यात पालिका क्षेत्रातील सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकाना दर्जेदार सरकारी आरोग्यसेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वसई-विरार परिसरातील वाढती लोकसंख्या, अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांवरील ताण, गंभीर आजारांसाठी अपुऱ्या सुविधा लक्षात घेता आचोळे येथील ४०० खाटांचे रुग्णालय महत्त्वाचे मानले जाते. या रुग्णालयामुळे मुंबई किंवा इतर ठिकाणी उपचारांसाठी जाण्याची गरज कमी होणार आहे. तसेच स्थानिक पातळीवर दर्जेदार उपचार मिळणार आहेत. या रुग्णालयाची निविदा प्रक्रियेला सुरुवात झाल्याने लवकरच ठेकेदाराची निवड होऊन प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच प्रशासनाच्या माहितीनुसार निश्चित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेतील आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार असून, सामान्य नागरिक, गरीब व गरजू रुग्णांसाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.
---------------------------------
तीन वेळा भूमिपूजन
- रुग्णालय उभारणीसाठी तीन वेळा भूमिपूजन करण्यात आले होते. जमिनीचा तिढा असल्याने रुग्णालय रखडले होते. याआधी या जमिनीवर सत्र न्यायालय व न्यायाधीश निवासस्थान बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने परिपत्रक काढले होते.
- तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १९ ऑगस्ट २०२१ मध्ये रुग्णालयाचे उद्घघाटन करण्यात आले होते. तीन वर्षे उलटून गेल्यानंतर १० जुलै २०२४ रोजी पुन्हा एकदा खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्याच दिवशी आमदार क्षितीज ठाकूर यांनी भूमिपूजन केले.
----------------------------------
वसई-विरार महापालिका हद्दीत आचोळे येथील भूखंड क्रमांक ६ वर रुग्णालय उभे राहणार आहे. दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी रुग्णालय सात मजल्याचे असणार आहे. या इमारतीचे क्षेत्रफळ ४४१४४.६० चौरस मीटर इतके आहे. रुग्णालय इमारतीच्या तळमजल्याखाली दोन तळमजले आहेत. त्यामध्ये तब्बल २५० चारचाकी वाहने, आठ ते दहा रुग्णवाहिका आणि साधारणपणे १०० दुचाकी पार्किंगची व्यवस्था यासह इतर व्यवस्था आहेत.
---------------------------------
रुग्णालयाची वैशिष्ट्ये
- तळमजला - अभ्यंगतासाठी प्रतीक्षालय, प्रशासकीय बाह्यरुग्ण विभाग, नोंदणी कक्ष, रुग्ण, रक्त तपासणी, विविध तपासणी अहवाल कक्ष, १६ खाटांचा आपातकालीन विभाग, पोलिस कक्ष, अतिदक्षता विभागाचे सहा खाटा, बाह्यरुग्ण कक्षासाठी १७ बेड, दोन सीटी स्कॅन, दोन क्ष किरण, दोन रेडिएशन कक्ष, शवविच्छेदन कक्ष, औषध निर्माण गृह.
- पहिल्या मजला ः प्रतीक्षालय, पंधरा बेडचे केमोथेरपी कक्ष, १८ बेडचे डे केअर, ब्लड बँक, डॉक्टर आणि स्टाफ रूम, विविध यंत्रणेच्या साहित्याची रूम, २४ बेडेड ओपीडी, स्टाफ रूम, मेमोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, युसीजीयुएसजीसाठी प्रत्येकी एक कक्ष अशा सुविधा आहेत.
़़़़ - दुसरा मजला ः प्रतीक्षालय, सेमिनार एरिया, किचन पॅन्ट्री, स्टाफ कॅन्टिंग, सामान्य कॅन्टिंग, व्हीआयपी कॅन्टिंग, ट्वीन शेअरिंग रूम, सहा बेड व्हीआयपी सिंगल शेरिंग रूम, पाच बेड आयव्हीएफसाठी, रेस्ट रिकवरी पाच बेड, आयव्हीएफ, शस्त्रक्रियागृह, एक नर्सिंग स्टेशन.
- तिसरा मजला - ४८ बेडचे सामान्य कक्ष, ट्विन शेअरिंगचे ३२ बेडचे कक्ष, सिंगल शेरिंगचे १६ बेडचे कक्ष, पाचव्या माळ्यावर जनरल वॉर्ड ४८ बेड, ट्विन शेरिंग २० बेड, सिंगल शेरिंग १६ बेड असणार आहेत.
- सहावा मजला ः प्रतीक्षालय, डॉक्टर्स कक्ष, मीटिंग रूम, ट्रेनिंग लॅब, प्रशासकीय कार्यालय, प्रशिक्षण कार्यालय, ग्रंथालय, कॉन्फरन्स रूम, महिला पुरुष परिचारिक कक्ष
- सातवा मजला ः प्रतीक्षालय अतिदक्षता विभागासाठी सात बेड, औषधालय, सर्जिकल सात बेड, हृदयरुग्णांसाठी दहा बेड, लसीकरण कक्ष, चार शस्त्रक्रियागृह, शस्त्रक्रिया पूर्व आणि नंतरसाठी १३ खाटा, भूलतज्ज्ञ कक्ष असणार आहे.
प्रतिक्रिया :
मनोज सूर्यवंशी, आयुक्त वसई-विरार महानगरपालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.