केईएमच्या नाव बदलावरून वाद
किंग एडवर्ड काढून सेट गोरधनदास करण्याच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : केईएम रुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रुग्णालयाच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला. या वेळी ‘सेठ गोरधनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय’ या नावातील ‘एडवर्ड स्मारक’ हा उल्लेख वगळण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना ही लोढा यांनी केली.
केईएममध्ये नागरिकांसाठी स्वतंत्र आरोग्य सुविधा केंद्र, आरोग्य स्वयंसेवकांसाठी बैठक व्यवस्था तसेच सरकारी आरोग्य योजनांची माहिती देणारे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची सूचना करण्यात आली. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून देश-विदेशातील वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत करणारे कम्युनिकेशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. विद्यार्थ्यांना सामाजिक सेवेत सहभागी करून घेणे, एनएसएस-एनसीसीच्या माध्यमातून रुग्ण व नातेवाइकांना मदत, तसेच डॉक्टरांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन यावरही भर देण्यात आला. शंभर वर्षांच्या प्रवासावर आधारित स्मरणिकेची निर्मिती करावी आणि कोविडसारख्या संकटातील केईएमच्या योगदानाचे दस्तऐवजीकरण व्हावे, अशी अपेक्षा लोढा यांनी व्यक्त केली.
अहमदाबाद नाव बदला ः अरविंद सावंत
केईएमच्या नाव बदलावरून आता राजकीय वाद सुरू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केईएमचे नाव बदलण्याऐवजी रुग्णांना, डॉक्टरांना सोयीसुविधा कशा मिळतील, यावर लक्ष घालण्याचा सल्ला दिला. तसेच अहमदाबादचेही नाव आधी बदला, असा उपदेशही सावंत यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.