पनवेल, ता. २२ (वार्ताहर) : ऑनलाइन मागवलेल्या चिकन नूडल्समध्ये चिकनचे तुकडे नसल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय महिलेच्या नाकावर हॉटेलचालक महिलेने मोठ्या पळीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात हॉटेलच्या महिला चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निकिता मंडळ (वय २५, रा. हरिग्राम केवाळे, ता. पनवेल) हिने रविवारी (ता. १८) रात्री एका फूड डिलिव्हरी ॲपवरून ऑनलाइन चिकन नूडल्सची ऑर्डर दिली होती; मात्र ऑर्डर मिळाल्यानंतर त्यात चिकनचे तुकडे नसल्याचे निकिताच्या निदर्शनास आले. याबाबत तक्रार करण्यासाठी ती विचुंबे येथील ‘एन्जॉय स्नॅक्स ॲण्ड चायनीज’ या दुकानात गेली. निकिताने नूडल्समध्ये चिकन नसल्याबाबत हॉटेलचालक ललिता राजेंद्र प्रसाद यांना जाब विचारला. याचा राग आल्याने ललिता यांनी निकिताला शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपाला गेला, की ललिता यांनी संतापून चायनीज पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डब्बूने (मोठी पळी) निकिताच्या नाकावर जोरात प्रहार केला. या हल्ल्यात निकिता जखमी झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.