मुंबई

माघी गणेशोत्सवाचा भक्तीमय उत्साह

CD

माघी गणेशोत्सवाचा भक्तिमय उत्साह
गणरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भक्तांची गर्दी; घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पांचे आगमन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : माघ महिन्यात साजरा होणारा माघी गणेशोत्सव गुरुवारी (ता. २२ ) भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला. पहाटेपासूनच शहरातील तसेच उपनगरांतील गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. गणरायाला दुर्वा, मोदक आणि नैवेद्य अर्पण करून सुख-समृद्धीची प्रार्थना करण्यात आली. माघी गणेशोत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व असून, आजच्या दिवशी गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
सिद्धिविनायक, प्रभादेवी, गणेश गल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी, तसेच उपनगरांतील अनेक मंदिरांमध्ये विशेष आरती, अभिषेक आणि भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली होती. स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष रांगांची व्यवस्था करण्यात आल्याने दर्शन प्रक्रिया सुरळीत पार पडली. माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने घराघरांतही गणपती पूजन, सत्यनारायण पूजा आणि धार्मिक विधी करण्यात आले. भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून रथसप्तमीपर्यंत सात दिवस चालणाऱ्या माघी गणेशोत्सवाला १९ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, रथसप्तमीला म्हणजेच २५ जानेवारी रोजी मूर्ती विसर्जनाने उत्सवाची सांगता होणार आहे. वरद विनायक चतुर्थीनिमित्त सार्वजनिक गणेश मंडलांत गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना होत असून, अनेक गणेशभक्त घरगुती स्वरूपात दीड दिवसांसाठी गणेशाची स्थापना करत आहेत. माघी गणेश जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जात असून शहरभर धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
मार्वे रोडवरील अग्निशमन केंद्र परिसरातील विघ्नेश्वर गणपती मंदिर तसेच जनकल्याण नगर उद्यानातील गणपती मंदिरातही पूजा-अनुष्ठानांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी आणि टिटवाळा येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरांत विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाप्पांची पालखी शोभायात्रा काढण्यात येत असून विधिवत अनुष्ठानांसह प्रतिष्ठापना केली जात आहे. मंदिर परिसरात अखंड भजन-कीर्तन सुरू असून, भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. यावर्षी आम्ही पहिल्यांदाच घरी माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरी गणेशाची स्थापना केली आहे. घरी गणेशाचे स्वागत करताना उत्सवाचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया गणेशभक्त प्राची शर्मा यांनी दिली.

गणरायाची प्रतिष्‍ठापना
गिरगाव, भायखळा, लालबाग, परळ, दादर तसेच पूर्व व पश्चिम उपनगरांतील शेकडो सार्वजनिक गणेशोत्सव मंडलांत माघी गणेश जयंतीनिमित्त गणपतीची स्थापना करण्यात येत आहे. मालाड, डोंबिवली, अंधेरी, गोरेगावसह विविध भागांत धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT