मुंबई

कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून वर्गखोलीपर्यंत संषर्घ

CD

विक्रम गायकवाड : सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ : पहाटेच्या धुक्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांतून उपजीविका शोधणाऱ्या महिला आणि दुपारी वही-पुस्तके घेऊन वर्गात बसलेल्या विद्यार्थिनी, असे चित्र आज नवी मुंबईत वास्तव बनले आहे. स्त्री मुक्ती संघटनेने नवी मुंबई महापालिकेच्या साह्याने सुरू केलेल्या ‘स्लम मॉडेल’मधून उभ्या राहिलेल्या कचरावेचक महिलांचा हा प्रवास आता दहावीच्या परीक्षेपर्यंत पोहोचला आहे. वर्षानुवर्षे शिक्षणापासून दूर राहिलेल्या या महिलांपैकी १३ जणी यंदा दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. ही केवळ परीक्षा नाही, तर आयुष्याला दिलेले ठाम उत्तर आहे.

स्त्री मुक्ती संघटनेने नवी मुंबईतील विविध झोपडपट्ट्यांतील महिलांचे संघटन उभारून ‘स्लम मॉडेल’ सुरू केले आहे. या मॉडेलमधील शेकडो महिला घरोघरी जाऊन ओला-सुका कचरा संकलन करतात. या उपक्रमामुळे त्यांना नियमित उत्पन्नाचा आधार मिळाला. मात्र, हा प्रकल्प फक्त स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता महिलांसह त्यांच्या कुटुंबांच्या विकासाकडे वळला आणि त्यातूनच शिक्षणाचा नवा अध्याय सुरू झाला.

या महिलांपैकी बहुतेकांच्या मनात लहानपणी शिकण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, दारिद्र्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लहान वयातच कामावर जावे लागल्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट सुटले. कुणी सातवीत, कुणी आठवीत, तर कुणी नववीत शाळा सोडली. त्यानंतर लग्न, संसार आणि जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. सुरुवातीला २५ महिला पुढे आल्या, मात्र अखेर १३ जणींनी सर्व अडचणींवर मात करत परीक्षा देण्याचा निर्धार केला. बहुतेकांचे शिक्षण १५ ते २० वर्षांपूर्वी सुटले होते. लग्नानंतर नाव बदलणे, काहींचे एकल पालकत्व असणे, कागदपत्रांची कमतरता, यामुळे अर्ज भरण्यापासून नोंदी जुळवण्यापर्यंत अनेक अडथळे आले, पण सर्वांवर मात करत अखेर त्यांच्या नावांची बोर्डात नोंद झाली.

शिक्षकांचीही मोलाची मार्गदर्शन
अनेक वर्षे शाळेपासून दूर असलेल्या महिलांना शिकवायचे कसे, साहित्य कुठून आणायचे, अभ्यास कोण घेणार, हे प्रश्नही उभे राहिले. प्रभात ट्रस्टचे प्रशांत थोरात यांनी शैक्षणिक साहित्य दिले. समन्वयक आशा गायकवाड यांच्या पुढाकारातून प्रशांत गाडेकर, अजित खताळ, अशोक गालवे, आशा पाटील, निशा राठोड, सचिन आमडोस्कर, पल्लवी घारगे, मधुकर वारभुवन या शिक्षकांनी मार्गदर्शन स्वीकारले. आज कोपरखैरणे येथील स्त्री मुक्ती संघटनेच्या इमारतीत त्यांचे नियमित वर्ग भरतात.

मुलगी घेते आईचा अभ्यास
सकाळी घरकाम, त्यानंतर कचरा संकलन आणि दुपारी थेट वर्ग, असा त्यांचा दिनक्रम आहे. सुरुवातीला काहींना कुटुंबाचा विरोध झाला, पण त्यांची जिद्द पाहून कुटुंबीयही पाठीशी उभे राहिले. एका महिलेची मुलगी दहावीत असून, ती रोज आईचा अभ्यास घेते.

आत्मनिर्भर होण्याचा मानस
सुरुवातीची भीती आणि संकोच आता आत्मविश्वासात बदलला आहे. स्त्री मुक्ती संघटनेमुळे आम्हाला ही संधी मिळाली, तिचं सोनं करू, असे त्या ठामपणे सांगतात. दहावीनंतर काही जणी पुढील शिक्षण, काही समाजकार्य, तर काही मुलांसाठी मार्गदर्शक होण्याचे स्वप्न पाहत आहेत. फक्त कचरा वेचक म्हणून नाही, तर शिकलेली, आत्मनिर्भर महिला म्हणून जगायचे आहे, हा त्यांचा समान सूर आहे.

चित्रपट ठरला प्रेरणादायी
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘आता थांबायचं नाही’ हा चित्रपट त्यांना दाखवण्यात आला. त्यातील संघर्षात त्यांना स्वतःचे प्रतिबिंब दिसले आणि ‘आपणही शिकू शकतो. आपणही दहावी उत्तीर्ण होऊ शकतो,’ हा विचार प्रथमच त्यांच्या मनात ठामपणे रुजला. यानंतर प्रा. वृषाली मगदूम यांच्या पुढाकाराने दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू झाली.

या महिला फक्त परीक्षा देत नाहीत, त्या समाजाला धडा देत आहेत. शिक्षणासाठी ना वय अडथळा असते, ना परिस्थिती. कचऱ्यातून कागद वेचणाऱ्या हातांनी आज वही उचलली आहे, हीच खरी क्रांती आहे.
- प्रा. वृषाली मगदूम, विश्वस्त, स्त्री मुक्ती संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT