मुंबई

मंगलमूर्ती मंदिरात सहस्र गणेश आवर्तनं

CD

मंगलमूर्ती मंदिरात सहस्र गणेश आवर्तन
इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
विरार, ता. २२ (बातमीदार) : यंगस्टार्सचे अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रेरणेने विरार पश्चिमेकडील मंगलमूर्ती मंदिरात माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून गुरुवारी (ता. २२) सकाळी सहस्र गणेश आवर्तन पठणाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उत्कर्ष शाळेतील इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. महत्त्वाचे म्हणजे, हे सर्व विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील आहेत. असे असतानाही त्यांनी ज्याप्रकारे गणेश सहस्र आवर्तनातील श्लोकांचे स्पष्टपणे उच्चार केले, त्यामुळे मंदिरात उपस्थित भाविकांची त्यांनी मने जिंकली.
मंगलमूर्ती मंदिराचे ट्रस्टी किरण ठाकूर व संजय सामंत यांच्या हस्ते गणेशपूजन पार पडल्यानंतर महाजन गुरुजी व शाळेतील शिक्षिका यांच्याबरोबर विद्यार्थ्यांनी गणेश आवर्तनास सुरुवात करीत मंदिरात चैतन्य व भक्तिमय वातावरण निर्माण केले. शेवटी गणपतीची आरती व प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उत्कर्ष शाळेचे मुख्याध्यापक संतोष तिवारी यांच्या सहकार्याने व नगरसेवक अजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुग्धा लेले, मिलिंद पोंक्षे, सुरेखा कुरकुरे, किरण ठाकूर व संजय सामंत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT