मुंबई

श्रीमलंग गड यात्रा उत्सवात शांतता राखा

CD

उल्हासनगर, ता. २२ (बातमीदार) : येत्या २ फेब्रुवारीला होणाऱ्या श्रीमलंग गड उत्सव यात्रेच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन उल्हासनगर पोलिस परिमंडळ चारचे उपायुक्त सचिन गोरे यांनी केले आहे. ठाकरे गटासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले. या वेळी सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे, हिललाईन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप शिवले उपस्थित होते.
मागील वर्षी श्रीमलंग गड उत्सव यात्रेदरम्यान एका शाखाप्रमुखाकडून तणाव निर्माण करणारी घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करत अटक केली. यंदा अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच यात्रा गुण्यागोविंदाने व शांततेत पार पडावी, यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सचिन गोरे यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना केले.
बैठकीला कल्याण जिल्हाप्रमुख शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू व भीमसेन मोरे, विधानसभा प्रमुख नारायण पाटील, महिला आघाडी संघटक जया तेजी, श्रीमलंग गड तालुकाप्रमुख सुरेश पाटील, अंबरनाथ शहरप्रमुख अभिजित काळे, संदीप पगारे, म्हारळ शहरप्रमुख प्रकाश चौधरी, उल्हासनगर शहरप्रमुख शिवाजी जावळे, उपशहरप्रमुख दिलीप मिश्रा, तसेच पदाधिकारी रामदास ढोणे आदी उपस्थित होते.

श्रीमलंग गड उत्सव यात्रेदरम्यान कोणताही अनुचित किंवा अघटित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी ७०० पोलिस कर्मचारी आणि ५० अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
- सचिन गोरे, पोलिस उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT