वाहतूक शाखेकडून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : रस्ता सुरक्षा अभियान २०२६ च्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस दलाकडून जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून सीवूड्स वाहतूक शाखेच्या वतीने गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालयात रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात सीवूड्स वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम सोप्या भाषेत समजावून सांगितले. वाहतूक फलक, सिग्नल, झेब्रा क्रॉसिंगचे महत्त्व तसेच रस्ता ओलांडताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी हेल्मेट व सीट बेल्ट वापराबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील चार शिक्षिका व सुमारे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. वाहतुकीचे नियम दंडासाठी नसून जीवित रक्षणासाठी आहेत, असा संदेश वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहिनी लोखंडे यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.