मुंबई

श्रीदत्त इंटरप्रायझेस कंपनीत स्फोट, चार कामगार गंभीर जखमी

CD

उसर गावात कंपनीत स्फोट
चार कामगार गंभीर
वाडा, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यातील उसर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या श्रीदत्त इंटरप्रायझेस या कंपनीत रिॲक्टरचा स्फोट झाला. या अपघातात चार कामगार गंभीररीत्या भाजले असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी (ता. २१) रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भागवत विश्वकर्मा (वय ४०) या कामगारावर ठाणे येथे तर सुदामा (वय २१), भाईलाल (वय ३२) भगवान दास (वय ३५) या कामगारावर अंबाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
तालुक्यातील उसर येथे श्रीदत्त इंटरप्रायझेस ही कंपनी आहे. या कंपनीत जुने टायर जाळून त्यातून ऑइल आणि तारा यांचे उत्पादन घेतले जाते. बुधवारी रात्री काम सुरू असताना रिॲक्टरचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. यात चार कामगार गंभीररीत्या भाजले. यातील भागवत हा कामगार गंभीररीत्या भाजल्याने त्याला सर्वप्रथम अंबाडी येथे आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलविण्यात आले आहे. तर उर्वरित कामगारांवर अंबाडी येथे उपचार सुरू असून, चौघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. वाडा तालुक्यात सुमारे ७७ कंपन्या आहेत. यातील अनेक कंपन्यांना बंदच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, कंपनीमालक रात्री राजरोसपणे कंपन्या चालवत आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनांत वाढ होत आहे. गेल्या महिन्यापूर्वी लखमापूर येथील एका टायर कंपनीत असाच एक स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. वाडा पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
-----------
वाडा तालुक्यातील सर्वच टायर कंपन्या शासनाचे नियम न पाळता सुरू आहेत. या कंपन्यांविरोधात मी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘अर्थपूर्ण’ व्यवहारामुळे कंपन्या सुरूच आहेत. त्यामुळे अनेक अपघात होऊन निष्पापांचा बळी जात आहे, तर काही कामगार कायमचे जायबंदी होत आहेत. उसर येथील घटनेत प्रशासन तेवढेच जबाबदार असून, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी माझी मागणी आहे.
- कल्पेश पाटील, तक्रारदार, टायर पायरोलोसेस कंपन्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Why Grape Farmers Face Losses? द्राक्षबागेत पीकच न आल्याने शेतकऱ्याने झाडाला घेतला गळफास; साडेतीन ते चार एकरांत केली होती द्राक्ष शेती!

Hailstorm Damage: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! मध्यरात्री गारपिटीचा तडाखा; आंबा-संत्रा बागांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी!

Ashok Kharat: ५८ व्हिडिओनंतर नवा धक्का... कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना, मध्यरात्री फार्महाऊसमध्ये काय सापडलं?

Success Story: जिद्द, परिश्रमाच्या जोरावर उभारली उत्तुंग यशाची गुढी; कोमल ढवळे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर झेप!

SCROLL FOR NEXT