मुंबई

नवी मुंबईत महिलाराज

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ : महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आज (ता. २२) महापौरपदाकरिता आरक्षण जाहीर झाले. नवी मुंबई महापालिकेसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापौर विराजमान करण्याचा मान भाजपला मिळणार आहे. महापौरपदाच्या आरक्षणामुळे आता कोणत्याही जातीमधील महिला नगरसेविकेला महापौर पद मिळू शकते. त्यानुसार भाजपकडे तब्बल २९ महिलांच्या नावांचा पर्याय आहे; परंतु भाजपचे पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावाला पसंती देत आहेत, याची उत्सुकता लागली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या १११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने ६५ जागांवर विजय मिळवला. महापालिकेत सत्ता स्थापनेकरिता ५६ जागांची आवश्यकता आहे, त्यापेक्षा अधिक जागांचे बळ भाजपकडे आहे. त्यामुळे महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निर्विवाद आहे. फक्त महापौरपदाचे आरक्षण जाहीर नसल्यामुळे कोणाच्या गळ्यात माळ पडणार, हे स्पष्ट होत नव्हते. आज नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदाचे सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे कोणत्याही वर्गातील महिला नगरसेविकेला महापौर होता येणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहात एकूण ६५ नगरसेवकांपैकी २९ महिला आहेत. यात दोनपेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्या ज्येष्ठ नगरसेविकांचा समावेश आहे. महापालिकेतील सभागृह चालवण्यासाठी, विरोधी पक्षातील नगरसेवकांसहीत सर्वांवर अंकुश ठेवण्याचे अधिकार महापौर हे पीठासीन अधिकारी असल्यामुळे त्यांना असते; मात्र वेळीच आपले अधिकार वापरून सभागृहावर नियंत्रण ठेवण्याची समयसूचकता असणारी महिला नगरसेविका निवडावी लागणार आहे.

नवी मुंबई महापालिकेतील महापौरपदापासून ते अगदी स्थायी समितीपर्यंतचे सर्व निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांच्या आदेशाने घेतले जातात. त्यामुळे भाजपमधून निवडून आलेल्या कोणत्या नगरसेविकेच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.

पहिल्या महापौर
नवी मुंबई महापालिकेची स्थापना १९९२ मध्ये झाली. त्यानंतर १९९४ मध्ये पालिकेची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीनंतर संजीव नाईक हे नवी मुंबईचे पहिले महापौर झाले. त्यांच्यानंतर सुषमा दंडे या दुसऱ्या महापौर होत्या; परंतु महिला म्हणून त्या पहिल्या महापौर ठरल्या.

पुन्हा घराणेशाहीला मान मिळणार का?
महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाल्यामुळे कोणत्याही गटातील महिला नगरसेविका महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; मात्र घराणेशाही पाहता पुन्हा नाईक यांच्या घरातील अथवा जवळीक असलेल्या महिला नगरसेविकेला हा मान मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ज्येष्ठांना संधी मिळण्याची शक्यता
सर्वात ज्येष्ठ नगरसेविका म्हणून नेत्रा शिर्के यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्यापाठोपाठ नाईकांच्या मर्जीतील असल्यामुळे माधुरी सुतार, सुजाता पाटील यांचे नाव घेतले जात आहे; परंतु नाईक यांच्या घरातील महिला नगरसेविका म्हणून आदिती नाईक आणि वैष्णवी नाईक यांचेही नाव कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.

आतापर्यंतच्या महिला महापौर
सुषमा दंडे १९९६-९७
विजया म्हात्रे १९९८-९९
मनीषा भोईर २००५-०७
अंजनी भोईर २००७-१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : प्रजासत्ताकदिनी सोन्याच्या भावात मोठी वाढ! चांदीही चमकली; जाणून घ्या आजचे भाव

Updates : तिलक वर्माची न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांतून माघार; T20 World Cup मध्ये नाही खेळणार? वॉशिंग्टन सुंदरही बाहेर..

शिक्षकांच्या पदोन्नतीत टीईटीचा खोडा! शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाने खळबळ, राज्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश..

Viral Video : ऐ गुजरने वाली हवा बता…! यशस्वी जैस्वालने गायलं Border मधील गाणं; नेटिझन्स म्हणतात, याला...

मुलांसाठी परफेक्ट ट्रेंड! 26 जानेवारीला बनवा आणखी खास ; Gemini AI वापरून तयार करा देशभक्तीपर फोटो, फक्त कॉपी पेस्ट करा 'हे' 5 प्रॉम्प्ट्स

SCROLL FOR NEXT