मुंबई

ठाण्यात फुटपाथच गायब!

CD

ठाण्यात फुटपाथच गायब!
गॅरेजसह जुन्या वाहनांच्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : ठाणेकरांसाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले फुटपाथ दुचाकी गॅरेज, वाहन दुरुस्ती केंद्रे आणि सेकंडहँड गाड्यांचे विक्रेते यांनी बळकावले आहेत. त्‍यामुळे पादचाऱ्यांसाठी चालण्याची सुरक्षित जागाच उरलेली नाही. अनेक ठिकाणी फुटपाथवरच वाहनांची दुरुस्ती व विक्री खुलेआम सुरू असून, नागरिकांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्‍यामुळे महापालिकेने अशाप्रकारे वाढत चाललेल्या अतिक्रमणावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ठाणेकरांकडून करण्यात येत आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना पार्किंगचा प्रश्न मात्र कायम दुर्लक्षित राहिल्याचे चित्र आहे. शहरभर ‘नो पार्किंग’चे फलक लावण्यात आले असले, तरी पर्यायी पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहनधारक संभ्रमात सापडले आहेत. काही मिनिटांसाठी वाहन उभे केले तरी वाहतूक पोलिसांकडून थेट दंड आकारला जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या ठाण्यात मेट्रो प्रकल्पाचे काम जोरात सुरू असल्यामुळे अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक मर्यादित करण्यात आली आहे. परिणामी, वाहनचालकांना सर्व्हिस रोडचा वापर करावा लागत आहे. मात्र, हेच सर्व्हिस रोड सेकंडहँड वाहनविक्रेत्यांनी दोन्ही बाजूंनी अडवून ठेवल्याने शहरातील अनेक भागांत भीषण वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या अतिक्रमणाचा थेट फटका कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी तसेच रुग्णवाहिका व अग्निशमन दलासारख्या अत्यावश्यक सेवांनाही बसत आहे. सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना कार्यालये व शाळांमध्ये वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. महापालिकेने पादचाऱ्यांसाठी उभारलेले फुटपाथ नेमके कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होत असून, फुटपाथ अतिक्रमण, अनधिकृत गॅरेज आणि रस्त्यावरील वाहनविक्रीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी ठाणेकर नागरिकांकडून जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: खऱ्या हुसैन मन्सुरींनी लावला डुप्लिकेट हुसैन मन्सुरीला व्हिडीओ कॉल; बघा कशी होतेय फसवणूक

Ichalkaranji Crime : घरातून सुरू झालेली नशा आता मोबाईलवर; इचलकरंजीत इंस्टावर इंजेक्शन विक्री

Malegaon Blast: मालेगावात प्रजासत्ताक दिनाच्या समारंभादरम्यान मोठा स्फोट; दोन मुलांसह पाच जण जखमी, नेमकं काय घडलं?

Train Delay Compensation : ट्रेन उशिरा पोहोचल्याने NEET परीक्षेला मुकली विद्यार्थिनी, आता मिळणार तब्बल 'इतक्या' लाखांची भरपाई

Latest Marathi news Update : शिवसेना नाही तुमची गद्दरांची गॅंग आहे... अंबादास दानवेंचा उदय सामंतांवर पलटवार

SCROLL FOR NEXT