मुंबई

ध्यान–शाकाहार जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय रॅली

CD

ध्यान-शाकाहार जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय रॅली
नेरूळ, ता. २२ (बातमीदार) : आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक शांतता व आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी टिळक एज्युकेशन सोसायटीचे एस. के. कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स (स्वायत्त) व एक्स्टेन्शन युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मुंबई पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीच्या सहकार्याने ध्यान व शाकाहार जनजागृतीसाठी जिल्हास्तरीय रॅलीचे आयोजन करण्यात आले.
२१ जानेवारीला सकाळी ८ वाजता महाविद्यालय परिसरातून रॅलीची सुरुवात झाली. मुंबई व नवी मुंबईतील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ध्यानातून मनःशांती व शाकाहारातून निरोगी जीवन या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
रॅलीपूर्वी व नंतर घेण्यात आलेल्या ध्यान सत्रांमुळे सहभागींच्या मनाला शांतता लाभली. शाकाहाराचे आरोग्यविषयक महत्त्व तज्ज्ञांनी अधोरेखित केले. या उपक्रमाला प्राचार्या डॉ. स्वाती विटकर, उपप्राचार्या डॉ. शिखा पांडे, एनएसएस प्रोग्राम ऑफिसर प्रा. जीनल पांड्या व एक्सटेंशन युनिटच्या सर्व शिक्षक व विद्यार्थी तसेच पिरॅमिड स्पिरिचुअल सोसायटीचे राम बाबू व किरण गुरबानी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात पुन्हा हिट अँड रन; पाषाण परिसरात भरधाव कारची महिलेला धडक; जागीच मृत्यू

Sangli ZP Election : सांगलीत झेडपीचे वातावरण तापलं उमेदवाराच्या पतीवर प्राणघातक हल्ला, गाडी जाळली; पहाटे ३ वाजता जयंत पाटील घटनास्थळी

आजारी पत्नीला उपचाराला न्यायला पैसे नव्हते, ७० वर्षीय वृद्धाचा सायकल रिक्षाने ६०० किमी प्रवास

रक्ताचे डाग, डोळ्यांत भीती… तापसी पन्नूचा अस्वस्थ करणारा लूक चर्चेत, दीड वर्षांनंतर दमदार कमबॅक

'हॉट आहे का?' हॉस्टेलमधील रुममेटचे प्रायव्हेट फोटो, व्हिडीओ मैत्रिणीने प्रियकराला पाठवले

SCROLL FOR NEXT