मुंबई

दोन कोटी विद्यार्थी करणार कवायती

CD

दोन कोटी विद्यार्थी करणार कवायती
विक्रमाची तयारी सुरू; ‘सकाळ’च्या बातमीवर शिक्कामोर्तब

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : ७७व्या प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात पहिल्यांदाच तब्बल दोन कोटी विद्यार्थी २६ जानेवारीला देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायती करणार आहेत. यात सरकारी, अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनांच्या शाळांतील विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. राज्यात हा मोठा विक्रम करण्याची तयारी केली जात असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज मंत्रालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदे‍त दिली.
‘सकाळ’ने १३ जानेवारीला यासंदर्भातील ‘दोन कोटी विद्यार्थी गाणार देशभक्तीपर गीते’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या शालेय शिक्षण विभागाकडून देशभक्तीपर गीतांच्या कवायतीसंदर्भात विश्वविक्रमाची तयारी केली जात असल्याची माहिती समोर आणली होती. तोच कार्यक्रम आज शालेय शिक्षणमंत्र्यांनी मंत्रालयात जाहीर केला. देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायतीचा हा कार्यक्रम ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित असून तो शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणार आहे. यात राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमधून, सात लाखांपेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, शारीरिकदृष्ट्या कसरत, व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींनी या कार्यक्रमासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांचा संचलन सराव करून घेण्यात येत आहे. कवायतीचा कालावधी १५ ते २० मिनिटे असेल.
--
एकाच मैदानावर कार्यक्रम
सामूहिक कवायत संचलन गावातील, शहरातील मैदानाच्या क्षमतेनुसार विद्यार्थी शाळेत अथवा एका मैदानावर एकत्र करून कार्यक्रम होईल. कार्यक्रमास परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, पालक व समाजसेवी प्रतिनिधींना आमंत्रित केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT