ट्रकचालकाला लुटले
खालापूर, ता. २२ (बातमीदार) ः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकचालकाला चार चोरट्यांनी मारहाण करत लुटले. त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल असा एकूण २९ हजार ५०० रुपये किमतीचा माल चोरून नेल्याची घटना बुधवारी घडली. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुणे बाजूकडील फुडमॉलजवळ हा प्रकार घडला. ट्रकचालक मुंबई ते पुणे जात असताना फुडमॉलजवळ रस्त्याला चढण असल्याने ट्रकचा वेग कमी होता. त्या वेळी चार चोरट्यांनी ट्रकचालकाला खाली ओढून ठार मारण्याची धमकी दिली. त्याला मारहाण करत त्याच्याजवळील रोख रक्कम, मोबाईल चोरी करून नेला. याबाबत खोपोली पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस निकाळजे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.