मुंबई

मनसेने कल्याण-डोंबिवली महापौर पदाची संधी गमावली

CD

मनसेने महापौरपदाची संधी गमावली!
भाजपच्या मदतीने मिळाला कल्याण-डोंबिवलीत ‘बहुमान’
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ ः ‘अती घाई, पक्षाला संकटात नेई’ ही म्हण कल्याण-डोंबिवलीत सध्या मनसेला अगदी तंतोतंत लागू पडत आहे. लोकांची कामे करण्यासाठी सत्ता हवी म्हणून मनसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला; पण आरक्षण सोडत जाहीर होईपर्यंत धीर धरला असता तर कदाचित भाजपच्या मदतीने थेट महापौर बसला असता अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. शिवसेना शिंदे गटाकडे महापौरपदाच्या अनुसूचित जमातीसाठी दोन नगरसेवक आहेत. तर मनसेकडे एक नगरसेवक आहे. हुकुमाचा एक्का हातात असूनही राज्यात एकमेव मनसे महापौर बनवण्याची चालून आलेली नामी संधी पक्षाने गमावली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीने एकत्र लढवली होती; पण सुरुवातीपासून या दोन्ही पक्षांमध्ये सत्तेसाठी चढाओढ पाहायला मिळाली. शिवसेना शिंदे गटाचे ५३ तर भाजपला ५० असे एकूण १०३ नगरसेवक निवडून आले आहेत. सत्तेसाठी आवश्यक असलेल्या ६२ नगरसेवकांपेक्षा हा आकडा अधिक आहे; मात्र तरीही येथे आपल्याच पक्षाचा महापौर बसावा, यासाठी दोघे जुळवाजुळव करीत आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे चार नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. तर मनसेने आपल्या पाच नगरसेवकांचा जाहीर पाठिंबा दिला आहे. नेमका येथेच मनसेचा गेम चुकला असल्याची उघड चर्चा सुरू झाली आहे.

मतदारांना पटलेला नाही!
मनसेच्या स्थानिक नेत्यांनी शिंदे गटाला दिलेल्या पाठिंब्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू होती. शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा कल्याण-डोंबिवलीकर मतदारांना पटलेला नाही. यावरून मनसेच्या सेटलमेंट आणि दलबदलू राजकारण अधोरेखित झाले आहे. सर्वच स्तरातून टीकेची झोड उठत असताना पाठिंबा दिलेल्या नगरसेवकांमध्येही आता चलबिचल सुरू झाली आहे. याला कारण ठरले ते महापौरपदाच्या आरक्षणाचे. सत्तेत राहून कामे करता येतात, हे राजू पाटील यांचे म्हणणे खरे आहे, असे मानले तर शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या वादात मनसेला आरक्षणामुळे महापौरपदाची लॉटरी लागण्याची शक्यता होती.

समीकरण चुकले
कल्याण-डोंबिवली महापालिका महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले आहे. या प्रवर्गात तीन नगरसेवक निवडून आले आहेत. दोन शिंदे गटाकडे आहेत. भाजपकडे या प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही. तर मनसेकडे अनुसूचित जमातीची एक नगरसेविका आहे. त्या जोरावर मनसेने भाजपशी हातमिळवणी केली असती तर मनसेचा महापौर बनला असता. शिवसेना शिंदे गटाला सत्तेपासून बाहेर ठेवण्यासाठी भाजपलाही हा प्रयोग फायदेशीर ठरला असता. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीचा बदला राजू पाटील यांना घेता आला असता, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT