मुंबई

शिवसेना नगरसेवकावर भाजप पदाधिकाऱ्याचा हल्ला!

CD

शिवसेना नगरसेवकावर भाजप पदाधिकाऱ्याचा हल्ला!
बदलापुरात सत्ताधारी-विरोधक तणाव उफाळला
चतुरे-म्हसकर वादातून मारहाणीचा प्रकार
बदलापूर, ता. २२ (बातमीदार) ः बदलापूर पश्चिमेतील सोनिवली परिसरात भाजपचे पदाधिकारी तेजस उर्फ बंटी म्हसकर यांनी शिवसेनेचे नगरसेवक हेमंत चतुरे यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. सोनिवली येथे गणेश दर्शनासाठी गेलेल्या शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे यांची बंटी मस्करी यांच्याशी नजरा नजर झाली आणि त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत हेमंत चतुरे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बदलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, हेमंत चतुरे यांच्या स्वीकृत नगरसेवकपदावरून यापूर्वीही पक्षांतर्गत मतभेद होते. त्यानंतर आता भाजप पदाधिकाऱ्यांकडून त्यांना मारहाण झाल्यानंतर त्यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
निवडणुकीपूर्वी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली. दुसरीकडे मारहाणीचे आरोप असलेले तेजस उर्फ बंटी म्हसकर हे सत्ताधारी भाजप पक्षातील सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या नगरसेविका हेमांगी म्हसकर यांचे पती असून, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. या घटनेमुळे बदलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात संबंधित गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT