अमली पदार्थासह एकाला अटक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ ः अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दिवा रोड, खर्डी गाव येथील तलत वजाहत रसूल सय्यद (वय ४७) याला ठाणे शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो ७३६ ग्रॅम वजनाचा हेरॉइन जप्त केला आहे. या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सहा कोटी ९४ लाख ४० हजार किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शिळफाट्याकडून दिव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर तलत सय्यद हेरॉइन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री पोलिस उपनिरीक्षक दीपक डुम्मलवाड यांच्या पथकाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून त्याला अटक केली. त्यांच्याकडून एक किलो ७३६ ग्रॅम वजनाचा हेरॉइनसह रोख एक हजार, दहा हजारांचा मोबाईल असा सहा कोटी ९४ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शिळ डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास ठाणे शहर अमली पदार्थ विरोधी पथक करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.