मुंबई

विकास गोगावलेची शरणागती

CD

विकास गोगावलेची शरणागती
महाड हाणामारीचे प्रकरण; श्रीयांश जगतापकडूनही याचिका मागे
 
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : कॅबिनेट मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेने महाड पोलिसांकडे शरणागती पत्करल्याची माहिती शुक्रवारी (ता. २३) महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात दिली. त्यावर याप्रकरणी ‘गोगावले शिवसेना (शिंदे गट) आणि जगताप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) या दोन उपमुख्यमंत्र्यांच्या राजकीय पक्षांचे नेते सहभागी आहेत. त्यामुळे, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यालाही (श्रीयांश) अटक करावी लागेल,’ अशी मिश्कील टिप्पणी न्यायालयाने केली. 

दिवंगत माजी आमदार माणिक  जगताप यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते श्रीयांश जगतापविरोधातील गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे त्यांनाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास इच्छुक नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यानंतर, अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका श्रीयांशने मागे घेतली. त्यावर श्रीयांश आणि विकास दोघेही आमदारांची मुले आहेत. एक माजी, तर एक आजी आमदाराचा मुलगा असल्याची टिप्पणी न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठाने केली.  आरोपी विकास गोगावले यांना आत्मसमर्पण करण्यास सांगा, असे आदेश न्यायालयाने गुरुवारी (ता. २२) सुनावणीवेळी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सुनावणीदरम्यान, विकास गोगावले आणि त्यांचा चुलत भाऊ महेश गोगावले यांच्यासह सर्व आरोपींनी सकाळी महाड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.  दरम्यान, गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. मंत्र्यांची मुले गुन्हा करून मोकाट फिरतात. दुसरीकडे, मंत्री मात्र त्याच्या संपर्कात असतात; परंतु पोलिसांना आरोपी सापडत नाहीत? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का? मुख्यमंत्रीही याप्रश्नी गप्प का?, मंत्र्याच्या मुलांच्या प्रश्नी मुख्यमंत्री हतबल आहेत का, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली.


आठ जण पोलिसांना शरण
महाड, ता. २३ (बातमीदार) : उच्च न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केल्यानंतर रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याच्यासह अन्य आठ जण शुक्रवारी सकाळी ११ वाजता महाड शहर पोलिस ठाण्यामध्ये शरण आले. महाड नगर परिषद निवडणूक मतदानादरम्यान २ डिसेंबरला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. यामध्ये विकास गोगावले आणि प्रशांत जांबरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली होती. यानंतर पोलिसांनी विकास गोगावलेसह प्रशांत जांबरे व अन्य २९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत; मात्र दीड महिन्यांनंतरही आरोपी विकास गोगावले व त्यांचा पुतण्या महेश गोगावले यांना अटक होत नसल्याने रायगड पोलिस व सरकारवर न्यायालयाने ताशेरे ओढले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ११ वाजता आरोपी विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, वैभव मालुसरे, धनंजय मालुसरे, सूरज मालुसरे व सिद्धेश शेठ अशा एकूण आठ जणांनी महाड शहर पोलिस ठाण्यामध्ये शरणागती पत्करली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

Latest Marathi News Live Update : सिंहगड रोड पानमळा परिसरात गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT