मुंबई

महाराष्ट्र एकीकरण समितीची घाटकोपरमधील अनधिकृत फलकांवर कारवाईची मागणी

CD

महाराष्ट्र एकीकरण समितीची घाटकोपरमधील अनधिकृत फलकांवर कारवाईची मागणी
गुजराती भाषेतील फलकांमुळे भाषिक वाद चिघळवला जात असल्याचा आरोप
घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) : नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकांच्या आचारसंहिता कालावधीत घाटकोपर परिसर फलकविरहित करण्यात आला होता. मात्र निवडणूक निकालानंतर घाटकोपरमधील अनेक मुख्य रस्ते व चौकांमध्ये अनधिकृतपणे फलक व कमानी उभारण्यात आल्याने शहराचे विद्रूपीकरण होत असून, विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महापालिका व पोलिस प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
समितीच्या निवेदनानुसार, रस्त्यावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत कमानींमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून, वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका वाढत आहे. तसेच रुग्णवाहिका यांसारख्या आपत्कालीन सेवांच्या वाहनांनाही अडथळे निर्माण होत आहेत. याचा फटका शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांनाही बसत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः पंतनगर परिसरात गुजराती भाषेतील फलक व कमानी लावण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या भागात यापूर्वीही मराठी व गुजराती भाषिकांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या असताना, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा स्वरूपाचे फलक लावून मुद्दाम भाषिक वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप समितीने केला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
राज्यघटनेनुसार मुंबई हे महाराष्ट्राचे मराठी शहर असून, काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक भाषिक तेढ निर्माण केली जात असल्याचा आरोप समितीने केला आहे. शहर विद्रूपीकरण कायद्यानुसार अनधिकृत फलक व कमानी तातडीने हटवाव्यात तसेच मराठी राज्यात राहून अन्य भाषांतील फलक लावून स्थानिकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिली.

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना गोवर्धन देशमुख यांनी सांगितले, ‘‘स्थानिक महापालिका अधिकारी व पोलिसांना मेलद्वारे तसेच निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT