मुंबई

बातमीचा परिणाम : एकता नगरमधील मुख्य मार्ग झाला काँक्रिटचा

CD

‘सकाळ’च्या बातमीचा परिणाम; एकतानगरमधील मुख्य मार्ग झाला काँक्रीटचा
एकतानगर मुख्य मार्गाचे काम जलद; वाहनचालक व प्रवाशांना दिलासा
कांदिवली, ता. २५ (वार्ताहर) : कांदिवली पश्चिम येथील म्हाडा वसाहतीतून चारकोपकडे जाणाऱ्या एकतानगर मुख्य मार्गाचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिक, प्रवासी व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दैनिक ‘सकाळ’मध्ये ‘धोकादायक प्रवास’ या मथळ्याखाली शुक्रवारी (ता. २) बातमी प्रसिद्ध होताच रस्ते विभागाने तातडीने कामाला गती दिली.
न्यू लिंक रोडवरील म्हाडा वसाहतीतून श्याम सत्संग मार्ग चारकोपकडे जातो. या मार्गावर एकतानगर, ब्ल्यू एम्पायर, गौरव गार्डन तसेच चारकोप परिसरातील प्रवासी व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. गेल्या वर्षभरापासून या १२ मीटर रुंदीच्या मार्गाचे टप्प्याटप्प्याने काँक्रीटीकरण सुरू होते. यातील अर्ध्या मार्गाचे काम पूर्ण झाले असले, तरी उर्वरित अर्ध्या मार्गावरून वाहतूक सुरू होती.
सिग्नल चौकाजवळील या खुल्या असलेल्या मार्गावर मोठे खड्डे, उंचसखल भाग तसेच चिखलयुक्त एक ते दीड फूट खोल खड्डे निर्माण झाले होते. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता, तर चारचाकी वाहनचालकांना पहिल्या गिअरमध्ये अतिशय काळजीपूर्वक वाहन चालवावे लागत होते. यामुळे वाहतूक कोंडीसह किरकोळ अपघातांच्याही घटना घडत होत्या.
या गंभीर स्थितीची दखल घेत ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत उर्वरित मार्गाचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले. सध्या संपूर्ण मार्ग वाहतुकीस खुला झाल्याने प्रवासी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते भूपेश कदम यांनी सांगितले, की वाहतुकीस खुल्या असलेल्या एकेरी मार्गावरील खड्डे, चिखल व उंचसखलपणामुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक झाला होता. ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने तत्काळ पावले उचलली आणि काम पूर्ण झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT