सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या दोन चोरट्यांना एमएचबी पोलिसांनी २४ तासांत केली अटक
कांदिवली, ता. २४ (बातमीदार) : बोरिवली पश्चिम येथील एलआयसी कॉलनीतील जय गुरुदेव भवन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी परिसरात एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढणाऱ्या दोन चोरट्यांना एमएचबी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. वसंती रामकृष्ण अय्यर (वय ७०, रा. पंचायतन सोसायटी, शांती आश्रम डेपोमागील परिसर, बोरिवली पश्चिम) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. सोसायटीतील अय्यप्पा मंदिरात दर्शनासाठी बुधवार (ता. २१) रात्री ७.३०च्या सुमारास त्या जात असताना पाळत ठेवणाऱ्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन खेचली. त्यानंतर तो रिक्षात थांबलेल्या साथीदारासह घटनास्थळावरून पसार झाला. सुदैवाने या घटनेत अय्यर यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
याप्रकरणी अय्यर यांनी एमएचबी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एमएचबी, कांदिवली व बोरिवली पोलिस ठाण्यातील पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच प्रत्यक्ष चौकशीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान दहिसर पूर्व येथील ज्ञानेश्वरनगर परिसरात राहणारे संजीव मुरलीधर गुप्ता (४३) आणि रिक्षाचालक राज नारायण छोटेलाल शर्मा (३५) यांना अटक करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिक्षा (क्रमांक MH-४७ C-२५७५) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.