मुंबई

महापौरपदासाठी भाजपची मोर्चेबांधणी

CD

महापौरपदासाठी भाजपची मोर्चेबांधणी
भिवंडीत गटनेता निवडीचा चेंडू प्रदेश कार्यालयाकडे
भिवंडी, ता. २४ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेत सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सत्ता स्थापनेच्या तयारीत असतानाच भाजपनेही महापौरपदासाठी कंबर कसली आहे. महापौरपदासाठी भाजपकडून नारायण चौधरी आणि सुमित पाटील यांची नावे चर्चेत असल्याची माहिती शहराध्यक्ष रवि सावंत यांनी दिली.

शुक्रवारी भाजप कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार महेश चौघुले यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत भाजपच्या गटनेता पदासाठी जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. संतोष शेट्टी, प्रकाश टावरे, नीलेश चौधरी, नारायण चौधरी, यशवंत टावरे, सुमित पाटील या सहा ज्येष्ठ नगरसेवकांनी या पदासाठी आपली दावेदारी सांगितली आहे. या सर्व इच्छुकांचे अर्ज भरून घेण्यात आले असून, ते अंतिम निर्णयासाठी प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहेत. तिथून जे नाव निश्चित होईल त्याची गटनेता म्हणून अधिकृत घोषणा केली जाईल.

मॅजिक फिगर गाठण्याचे आव्हान
भिवंडी महापालिकेत काँग्रेस ३० जागांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर भाजप २२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता, महायुतीकडे भाजप आणि शिवसेना मिळून ३५ सदस्य असे संख्याबळ आहे. बहुमताचा आकडा ४६ इतका आहे. त्यामुळे बहुमतासाठी महायुतीला अजून ११ सदस्यांची आवश्यकता आहे. मॅजिक फिगर गाठण्यासाठी आमची इतर सदस्यांशी बोलणी सुरू आहे, असे संकेत शहराध्यक्ष रवि सावंत यांनी दिले आहेत. त्यामुळे भिवंडीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आता मोठी चुरस निर्माण झाली असून, फोडाफोडीचे की अपक्षांच्या मदतीचे राजकारण रंगणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT