मुंबई

रजोनिवृत्ती क्लिनिकला महिलांचा चांगला प्रतिसाद

CD

रजोनिवृत्ती क्लिनिकला महिलांचा चांगला प्रतिसाद
दोन आठवड्यात सुमारे ४० महिलांची तपासणी
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) : महिलांच्या रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉज) काळात उद्भवणाऱ्या विविध आरोग्य समस्यांवर उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागामार्फत बुधवार (ता. १४)पासून जिल्हा, उपजिल्हा, महापालिका व निवडक ग्रामीण रुग्णालयांत विशेष मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात सुरू झालेल्या या क्लिनिकला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अवघ्या दोन आठवड्यांत सुमारे ४० महिलांची तपासणी करण्यात आली आहे.
रजोनिवृत्ती हा स्त्रियांच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा असून साधारण ४५ ते ५५ वयोगटात येतो. या काळात उष्णतेचे झटके, निद्रानाश, मूड बदल, सांधेदुखी, योनीमार्गात कोरडेपणा आदी शारीरिक व मानसिक समस्या जाणवतात. जिल्हा रुग्णालयातील हे क्लिनिक दर बुधवारी उपलब्ध असून महिलांची मोफत तपासणी, औषधोपचार व समुपदेशन केले जाते. त्यामुळे अल्पावधीतच या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दर बुधवारी सेवा उपलब्ध
जिल्हा रुग्णालयातील मेनोपॉज क्लिनिक दर बुधवारी सुरू असते. येथे महिलांची मोफत तपासणी, उपचार व वैद्यकीय मार्गदर्शन केले जाते. अधिकाधिक महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी यांनी केले आहे. महिलांच्या आयुष्यातील संवेदनशील मेनोपॉज टप्प्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नव्हते. त्यामुळेच मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा उपक्रम महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयातील हे रजोनिवृत्ती क्लिनिक दर बुधवारी महिलांच्या सेवेसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या वयोगटातील महिलांची मोफत तपासणी, औषधोपचार आणि समुपदेशन या दिवशी केले जाईल. पहिल्या आठवड्यात या क्लिनिकला महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला. जास्तीत जास्त महिलांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा.
- डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्ता (DA) तब्बल 58% वर; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

चेहऱ्यावरचे बारीक केस काढायचे आहेत? फक्त ‘ही’ घरगुती ट्रिक करा अन् पाहा फरक

T20 WC, IND vs ENG: भारत - इंग्लंड सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा येणार? कसे असेल वातावरण आणि फ्रीमध्ये कसा पाहाणार सामना?

तोतया पोलिसांना बसणार लगाम! अधिकारी, अंमलदारांना एनएफसी-क्यूआरयुक्त नवी ओळखपत्रे मिळणार

Latest Marathi News Live Update : धुळ्यातील साक्री येथील हनुमंतपाडा येथे पुतणी सोबत बोलण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT