मुंबई

शिवाजी पार्कवरील संचलनात कोकण पर्यटनाचा चित्ररथ

CD

शिवाजी पार्कवरील संचलनात कोकण पर्यटनाचा चित्ररथ
विजयदुर्ग, गणपतीपुळे, स्कुबा डायव्हिंग आणि रो-रो फेरीचे आकर्षक सादरीकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या संचलनात पर्यटन विभागाचा चित्ररथाचा समावेश आहे. यंदाच्या चित्ररथाची मुख्य संकल्पना ‘कोकण पर्यटन’ ही आहे. या संकल्पनेद्वारे कोकणची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक पर्यटन सुविधांचे दर्शन संपूर्ण राज्याला घडणार आहे.
यंदाच्या चित्ररथाच्या माध्यमातून कोकणच्या विस्तीर्ण किनारपट्टीचे आणि तेथील पर्यटनस्थळांचे हुबेहूब चित्रण करण्यात आले आहे. या चित्ररथात अरबी समुद्राचे रक्षण करणाऱ्या अभेद्य विजयदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्याचबरोबरीने गणपतीपुळे मंदिराचा देखावा पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहे. कोकणातील निसर्गरम्य चिंचोळा प्रदेश आणि आधुनिक पर्यटनाचा भाग असलेले स्कुबा डायव्हिंग, डॉल्फिन प्रतिकृती तसेच जलक्रीडामधील लोकप्रिय बनाना राइडचे कलात्मक सादरीकरण या चित्ररथाद्वारे करण्यात येईल.
कोकणच्या दळणवळणात क्रांती घडवून आणणाऱ्या रो-रो फेरीची प्रतिकृती या चित्ररथाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक असणार आहे. याद्वारे कोकणच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबर तेथील साहसी पर्यटनाचा आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा एकत्रित पट प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे.
या चित्ररथाबरोबरच पर्यटन विभागाने एक विशेष गीतदेखील तयार केले आहे. या गीतामध्ये कोकणच्या निसर्गापासून ते तेथील लोककला, परंपरा आणि संस्कृतीचे प्रभावी वर्णन करण्यात आले आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाचा डंका पुन्हा एकदा देशभर गाजणार आहे.

आम्ही स्कुबा डायव्हिंग, रो-रो फेरी यांसारख्या साहसी पर्यटन व आधुनिक सुविधांचे सादरीकरण चित्ररथातून केले आहे. युवक आणि पर्यटकांना कोकणाकडे आकर्षित करण्यात नक्कीच यशस्वी ठरेल.
- संजय खंदारे, प्रधान सचिव, पर्यटन

या चित्ररथामधून महाराष्ट्र पर्यटनाचा आधुनिक चेहरा पर्यटकांसमोर येईल. तसेच कोकणची निसर्गसंपदा, ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला आणि गणपतीपुळे यांसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडेल.
- डॉ. बी. एन. पाटील,
संचालक, पर्यटन संचालनालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Padma Awards: रोहित शर्मा, भगतसिंह कोश्यारी, अभिनेते धमेंद्र अन्... देशभरातील १३१ मान्यवरांना पद्म पुरस्कार २०२६ जाहीर, वाचा यादी

IND vs NZ 3rd T20I : हार्दिक पांड्याचा अविश्वसनीय झेल! किवी फलंदाज हर्षित राणासमोर पाचव्यांदा झाला फेल Video

Mark Tully Passes Away : ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण मार्क टली यांचे निधन, ९० व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

Republic Day 2026 : ७७ व्या प्रजासत्ताक दिनी इतिहास रचला जाणार! परेडमध्ये पहिल्यांदाच महिला ब्लॅक कमांडो

Lakhpati Didi : कोरोनात सुरू केलेली स्ट्रॉबेरीची शेती, ३ लाखांची कमाई! लखपती दीदी थेट प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये

SCROLL FOR NEXT