मुंबई

भीमनगरमधील पाण्याचा प्रश्न सुटणार

CD

भीमनगरमधील पाण्याचा प्रश्न सुटणार
सहा इंची नवीन पाइपलाइनचे काम सुरू

घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) : गेल्या अनेक वर्षांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे घाटकोपर पश्चिमेतील भीमनगर परिसरातील नागरिकांची गैरसोय होत होती. त्यावर नगरसेविका स्वरूपा पाटील यांच्या वतीने येथे नवीन सहा इंची पाण्याच्या पाइपलाइनचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आता सुटणार आहे.
घाटकोपर पश्चिमेतील भीमनगर परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. डोंगराळ भागात वसलेल्या या परिसरात झोपडपट्ट्यांची संख्या अधिक असून नोकरी, व्यवसाय करणाऱ्या रहिवाशांना पाण्यासाठी रोजची कसरत करावी लागत होती. भीमनगरमधील किरण सेवा मंडळ, एकता क्रीडा मंडळ, साईनाथ मंडळ, गुरव चाळ, आदर्श कॉलनी, पंचशील क्रीडा मंडळ आदी भागांमध्ये पाण्याची समस्या तीव्र स्वरूपात जाणवत होती. काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या असतानाही कमी दाबामुळे त्या भरत नाहीत. सकाळी ११ ते दुपारी १ आणि रात्री १२ वाजल्यानंतर पाणी येत असल्याने अनेक नागरिकांची झोपमोड होत होती. या पार्श्वभूमीवर, परिसरातील नागरिकांना योग्य वेळेत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १२७च्या नगरसेविका स्वरूपा पाटील यांच्या वतीने नवीन सहा इंची पाण्याच्या पाइपलाइनचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती शाखाप्रमुख संजय कदम यांनी दिली.

नूतन भीमज्योत येथील १८ इंची मुख्य जलवाहिनीला ही नवीन पाइपलाइन जोडण्यात येणार असून, त्यामुळे परिसरात मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारी पाण्याची समस्या आता कायमची सुटेल.
- स्वरूपा पाटील, नगरसेविका

फोटो - 403, ४१४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT