बविआसमोर विरोधकांचे आव्हान
वसई-विरारमध्ये भाजपच्या लोटस मिशनची चर्चा
प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. २४ : वसई-विरार महापालिकेवर यंदा खुल्या गटाचा महापौर विराजमान होणार आहे; मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर सक्षम उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. महापालिकेत पहिल्यांदाच तगड्या विरोधकांचा सामना करावा लागणार आहे; मात्र ठाकूरांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.
पालिका निवडणुकीत भाजपने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून झेप घेतली आहे. नव्या आमदारांच्या प्रभावामुळे भाजपचे संख्याबळ वाढले असून अनेक इच्छुकांनी दिग्गजांना धूळ चारली आहे. जरी बविआ प्रथम क्रमांकावर असली, तरी त्यांची सदस्यसंख्या लक्षणीय घटली आहे. माजी महापौर आणि स्थायी समिती सभापतींसारख्या दिग्गज नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. शिंदे आणि ठाकरे शिवसेनेला वसई-विरारमध्ये विशेष यश मिळाले नसले तरी, काँग्रेस आणि मनसेने बविआशी युती करून सत्तेचे नवे समीकरण जुळवले आहे.
फोडाफोडीचे राजकारण
काही दिवसांपूर्वी शहरात ‘लोटस मिशन’ राबवले जाणार आणि नगरसेवक फोडले जाणार, अशा चर्चांनी जोर धरला होता. त्यातच माजी महापौरांच्या ‘नाना म्हणतील तसं’ या फलकबाजीने राजकीय वातावरण तापवले होते. अशा स्थितीत फोडाफोडीचे राजकारण रोखून आपला गड राखण्यासाठी ठाकूर कोणता चेहरा पुढे करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अभ्यासू नेतृत्वाची गरज
महापौरपदावरील व्यक्तीला ११४ नगरसेवकांचा कारभार सांभाळावा लागणार आहे. केवळ प्रशासनावर अंकुश ठेवून चालणार नाही, तर सभागृहात भाजपसारख्या आक्रमक विरोधकांना तोंड देण्यासाठी अभ्यासू आणि प्रभावी वक्तृत्व असलेल्या नेतृत्वाची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.