मुंबई

रस्ता सुरक्षा महिन्यानिमित्त वाहतूक पोलिसांसाठी आरोग्य शिबिर

CD

वाहतूक पोलिसांसाठी आरोग्य शिबिर
वोक्हार्ट हॉस्पिटल्सचा उपक्रम

विरार, ता. २४ (बातमीदार) : मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सतर्फे रस्ता सुरक्षा महिन्यानिमित्त वाहतूक पोलिसांसाठी व्यापक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. हा उपक्रम रुग्णालयाच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) उपक्रमांतर्गत राबविण्यात आला आहे.
या आरोग्य शिबिरात मिरा रोड-भाईंदर विभागातील काशिमीरा पोलिस ठाणे आणि गोल्डन नेस्ट पोलिस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या २५०हून अधिक वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. वाहतूक पोलिस रस्ता सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडतात. त्यांना दीर्घकाळ सेवेसह प्रदूषण, मानसिक ताणतणाव आणि बदलत्या हवामानात काम करावे लागते. अनियमित आहार आणि तणावपूर्ण कार्यपरिस्थितीमुळे उच्च रक्तदाब यासारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे आजारांचे वेळेत निदान होऊन योग्य उपचार मिळावेत, यासाठी नियमित आरोग्य तपासणी अत्यंत आवश्यक ठरते. या सर्व बाबी लक्षात घेऊन वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरा रोड यांनी शिबिरादरम्यान विविध प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या केल्या. यामध्ये मधुमेह, रक्तदाब, ईसीजी तसेच इतर मूलभूत आरोग्य तपासण्यांचा समावेश होता. या उपक्रमाबाबत बोलताना वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरा रोडचे केंद्राचे प्रमुख डॉ. सुशील कुमार यांनी सांगितले, की वाहतूक पोलिस हे रस्ता सुरक्षेचा कणा आहेत. कर्तव्य बजावताना ते अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. या आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून आजारांचे लवकर निदान होणे आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करणे हा आमचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT