मुंबई

खालापुरात निवडणुकीची वाढली रंगत

CD

खालापुरात निवडणुकीची वाढली रंगत
चार जिल्हा परिषद गटासाठी २४, आठ पंचायत समिती गणात ४० उमेदवारी अर्ज दाखल
खालापूर, ता. २४ (बातमीदार) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसागणिक तापत चालले असून निवडणुकीची रंगत चांगलीच वाढली आहे. तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटांसाठी एकूण २४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून आठ पंचायत समिती गणांसाठी तब्बल ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सध्या डमी उमेदवार आणि बंडखोरांची मनधरणी सुरू असून मंगळवारी (ता. २७) अर्ज माघारीची अंतिम मुदत असल्याने त्या दिवशीच अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
खालापूर तालुक्यातील सावरोली जिल्हा परिषद गटात सर्वाधिक नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून येथे महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. परिवर्तन विकास आघाडीतील नाराज शेतकरी कामगार पक्षाने स्वतंत्र उमेदवार दिला असला, तरी अर्ज माघारीच्या दिवशी शेकापची नेमकी भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. चौक जिल्हा परिषद गटात चार उमेदवारी अर्ज दाखल झाले असून येथे भाजप, शिवसेना (ठाकरे गट) आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. वासांबे जिल्हा परिषद गटात परिवर्तन विकास आघाडी आणि भाजप यांच्यात थेट सामना अपेक्षित असून या गटातून पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आत्करगाव जिल्हा परिषद गटात सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), महायुती आणि शेकाप हे प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अर्ज माघारीनंतर खालापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार असून त्यानंतर प्रचाराला अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
................
दिग्गजांच्या लढती
पंचायत समिती गणाअंतर्गत चौक गणातून तीन, हाळखुर्द गणातून पाच, वासांबे गणातून चार, रिस गणातून सात, वाशिवली गणातून पाच, सावरोली गणातून पाच, खानाव गणातून सात आणि आत्करगाव गणातून चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, वासांबे आणि आत्करगाव जिल्हा परिषद गटातील लढती विशेष लक्षवेधी ठरणार आहेत. वासांबे गटातून माजी बालकल्याण सभापती उमा मुंडे यांचे पती संदीप मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या चुलत बहीण नेहा पारंगे निवडणूक रिंगणात आहेत. आत्करगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांच्या पत्नी व माजी पंचायत समिती सभापती श्रद्धा साखरे निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात जिल्हा परिषद माजी आरोग्य सभापती नरेश पाटील यांच्या घरातील उमेदवार रेश्मा पाटील मैदानात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT