मुंबई

आर्थिक साक्षरता कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

CD

आर्थिक साक्षरता कार्यक्रमातून जनजागृती

तलासरी, ता. २४ (बातमीदार) : तलासरी तालुक्यातील सवणे गावात ग्रामस्थांमध्ये आर्थिक व्यवहारांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पालघर व भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने महाबँक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान (मार्डेफ), स्वधारा फिनेस्क संस्था आणि सवणे ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने पार पडला.
हा कार्यक्रम जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. उपसरपंच सुनील धर्मा टोकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ग्रामस्थांना बचत, बँकिंग व्यवहार, विमा योजना, कर्ज प्रक्रिया, डिजिटल व्यवहार तसेच आर्थिक फसवणूक कशी टाळावी, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आर्थिक साक्षरता सल्लागार उज्ज्वला कोकणे यांनी सांगितले. स्वधारा फिनेक्स संस्थेचे प्रशिक्षक संजय आहाडी यांनी सुकन्या समृद्धी योजना व भविष्य निर्वाह निधी यांची माहिती दिली. तसेच प्रशिक्षक ज्योती बेंडगा यांनी उपस्थित महिलांचे विमा व री-केवायसीसंदर्भातील फॉर्म भरून घेतले. या कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित नागरिकांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील आर्थिक साक्षरता वाढण्यास निश्चितच मदत होईल, असे मत उपसरपंच सुनील टोकरे यांनी व्यक्त केले. त्यांनी नागरिकांना विमा संरक्षण घ्यावे, अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना व पीपीएफसारख्या योजनांचा लाभ घ्यावा तसेच छोट्या छोट्या गुंतवणुकी भविष्यात उपयोगी ठरतील, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आनंदी बीज, पेसा सदस्य अरविंद मेरे, सोसायटीचे सचिव रावजी दयात, सीआरपी वनिता धोदडे, वंदना वाढिया, लक्ष्मी रिंजड, जयवंत धोदडे व देऊ हबाले यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT