मुंबई

दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला विविध खेळांचा आनंद

CD

दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतला विविध खेळांचा आनंद

विक्रमगड, ता. २४ (बातमीदार) : तालुक्यातील एकमेव दिव्यांग विद्यार्थ्यांची निवासी शाळा असलेल्या झडपोली येथील जिजाऊ अंध व मतिमंद मुलांची निवासी शाळेत आंतरशालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या वेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग घेत खेळाचा आनंद लुटला.
स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून तसेच राजमाता जिजाऊ व लुई ब्रेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रतिज्ञा घेत स्पर्धांना सुरुवात केली. या स्पर्धांमध्ये २५, ५० व १०० मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक, सॉफ्टबॉल थ्रो, चमचा-लिंबू, संगीत खुर्ची, कॅरम, बुद्धिबळ, लंगडी तसेच क्रिकेट आदी विविध खेळांचा समावेश होता. विविध गटांमध्ये झालेल्या या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि क्रीडाभाव दाखविला. प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावनादेवी भगवान सांबरे आंतरराष्ट्रीय शाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर वाघ होते. जिजाऊ पोलिस अकॅडमी प्रमुख व कबड्डीपटू अरविंद देशमुख यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली. नुकत्याच मुंबई पोलिस भरतीत यश मिळवलेल्या प्रतीक्षा सातपुते यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी कोमल लोखंडे, महेश गायकवाड, सोनावणे सर, सुजित भानुशाली, जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते. समाजसेवक भगवान सांबरे, जिजाऊ महिला सक्षमीकरण पालघर जिल्हाप्रमुख हेमांगी पाटील तसेच माजी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती संदेश ढोणे यांनीही स्पर्धेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT